प्रसिद्ध गायकाने संपवलं स्वतःचं आयुष्य; रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह

धक्कादायक.. प्रसिद्ध गायकाच्या निधनाने सर्वत्र खळबळ, गायकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडल्यामुळे चर्चांना उधाण... गायकाने का संपवलं स्वतःचं आयुष्य... ?

प्रसिद्ध गायकाने संपवलं स्वतःचं आयुष्य; रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह
| Updated on: Jul 01, 2023 | 3:31 PM

मुंबई | झगमगत्या विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. गायकाच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, गायकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. गायकाच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र गायकाच्या निधनाची चर्चा सुरु आहे. ज्या गायकाचं निधन झालं आहे, तो पंजाबी गायक असून त्याचं नाव रणजीत सिद्धू असं आहे. रणजीत सिद्धू याने स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एवढंच नाही तर, गायकाच्या निधनाचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे.

रणजीत सिद्धू मृत्यू प्रकरणात जीआरपीचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. जीआरपीचे एसआय जगविंदर सिंह आणि एसआय नरदेव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलिसांना रात्री रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह सापडला होता.. चौकशी केल्यानंतर मृतदेह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून गायक रणजीत सिद्धू याचा असल्याची माहिती समोर आली..’

रिपोर्टनुसार, रणदीत सिद्धू याच्या पत्नीचं मोठं वक्तव्य देखील समोर आलं आहे. नातेवाईकांसोबत पतीचे वाद असल्याचा आरोप गायकाच्या पत्नीने केला आहे. नातेवाईकाच्या जाचाला कंटाळून गायकाचे स्वतःचं आयुष्य संपवल्याची माहिती समोर येत आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर सतत नातेवाईकांसोबत भांडण सुरु असल्याचं सत्य देखील समोर आलं आहे.

गायकात्या निधनानंतर पोलिसांनी केस दाखल केली आहे. शिवाय गायक रणजीत सिद्धू याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं असून मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला आहे. गायकाच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक चाहत्यांनी गायक रणजीत सिद्धू याला श्रद्धांजली वाहिली आहे.