Pushpa 2 | ‘पुष्पा 2’च्या सेटवरून ‘श्रीवल्ली’चा असा फोटो लीक; सस्पेंस उघड? अल्लू अर्जुनचे चाहते नाराज

'पुष्पा 2' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमधून रश्मिका मंदानाच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा झाला आहे.

Pushpa 2 | पुष्पा 2च्या सेटवरून श्रीवल्लीचा असा फोटो लीक; सस्पेंस उघड? अल्लू अर्जुनचे चाहते नाराज
Pushpa
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 05, 2025 | 3:39 PM

मुंबई : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता त्याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून त्याचं शूटिंगसुद्धा पार पडलं आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता आहे की दररोज सोशल मीडियावर नवीन ट्रेंड व्हायरल होतोय. नुकताच चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक फोटो व्हायरल झाला. रश्मिकाच्या या फोटोमुळे ‘पुष्पा 2’मधील मोठ्या सस्पेंसवरून पडदा उचलण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते नाराज झाले आहेत.

‘पुष्पा 2’मधील श्रीवल्लीबाबत मोठा खुलासा?

‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाची कथा अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन संपते. त्यामुळे ‘पुष्पा : रुल’ या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. अल्लु अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याला धमाकेदार पोस्टर प्रदर्शित केला होता. यामध्ये त्याचा कधी न पाहिलेला अवतार पहायला मिळाला होता. आता चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. हा फोटो पाहून ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीचं निधन होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पुष्पा 2 बद्दल नेटकऱ्यांचे दावे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना मृत्यूशय्येवर पहायला मिळतेय. तिच्या आजूबाजूला काही मृतदेह दिसत आहेत आणि काही लोक शोक व्यक्त करत आहेत. त्यामुळे चित्रपटात श्रीवल्लीच्या भूमिकेचा मृत्यू होणार की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ‘खलनायक भवर सिंह शेखासोबतच्या फाइट सीनदरम्यान पुष्पा त्याच्या पत्नीला गमावतो आणि नंतर तो श्रीवल्लीच्या मृत्यूचा सूड घेतो’, असा अंदाजही काहींनी वर्तवला आहे. या व्हायरल फोटोबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

पहा व्हिडीओ

पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाला आहे. त्याला आठ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही बातमी समोर येताच पुष्पाचे समर्थक भडकले आहेत.