Radhe Shyam | पाडव्याच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘डार्लिंग’ प्रभासचा रेट्रो लूक पाहून चाहते घायाळ!

Radhe Shyam | पाडव्याच्या मुहूर्तावर ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ‘डार्लिंग’ प्रभासचा रेट्रो लूक पाहून चाहते घायाळ!
राधे श्याम

साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) चित्रपट ‘राधे श्याम’ची (Radhe Shyam) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 13, 2021 | 12:41 PM

मुंबई : साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) चित्रपट ‘राधे श्याम’ची (Radhe Shyam) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त आज या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरमधून प्रभासच्या रेट्रो लूकने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Radhe Shyam New Poster launch on the occasion of Gudi Padwa).

प्रभासने राधे श्यामचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, ‘प्रेम म्हणजे सणांना बांधून ठेवणारा घटक. आनंद घ्या तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना गुढी पाडवा, बैसाखी, उगाडी, विशु, पुथांडू, जुआर अशा अनेक शुभेच्छा.’ पोस्टरमध्ये प्रभास खांबाला धरून उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर किंचित हास्य उमटले आहे. त्याचे हे पोस्टर 6 लाखाहून अधिक लोकांना आवडले आहे.

पाहा प्रभासचे पोस्टर :

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

पोस्टर प्रदर्शनासाठी सणांचा मुहूर्त

या आधी महाशिवरात्रीनिमित्ताने प्रभास आणि पूजा हेगडे यांचे पोस्टर प्रसिद्ध झाले. चित्रपटात ही जोडी प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडताना दिसणार आहेत. प्रभास आणि पूजा चित्रपटाच्या पोस्टरवर एकत्र झळकले आहेत.

हा चित्रपट 30 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभास आणि पूजा यांच्यासह भाग्यश्री, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय, रिद्धि कुमार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत (Radhe Shyam New Poster launch on the occasion of Gudi Padwa).

कॉस्ट्यूमवर कोट्यवधी रुपये खर्च

‘राधे-श्याम’ हा प्रभासच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात निर्माते प्रभासच्या वेशभूषावर जवळपास 6 कोटी खर्च करत आहेत. ज्यामुळे चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत.

आदिपुरुषमध्ये झळकणार प्रभास!

‘राधे श्याम’नंतर प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कृती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात प्रभास ‘राम’, सैफ अली खान ‘रावण’ आणि कृती सेनन ‘सीता’ची भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला होता. निर्मात्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला होता.

‘वॉर 2’मध्ये बनणार व्हिलन!

रिपोर्ट्सनुसार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यात येणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात हृतिकच्या या चित्रपटात प्रभास व्हिलनच्या भूमिकेत दिसू शकतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात टायगर श्रॉफने व्हिलनची भूमिका साकारली होती. पण शेवटच्या भागात त्याचा मृत्यू दाखवण्यात आला होता.

(Radhe Shyam New Poster launch on the occasion of Gudi Padwa)

हेही वाचा :

Alia Bhatt | आलियाचा नवा इंस्टाग्राम डीपी पाहिलात का?, कोरोनाशी लढत आठवतेय ‘ते’ दिवस…

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें