Rajkummar Rao : मराठीतला लव्हरबॉय तरी…ललित प्रभाकरच्या कसाबच्या भूमिकेबद्दल राजकुमार रावचं वक्तव्य

Rajkummar Rao : राजकुमार राव सध्या 'प्रहार' या सिनेमामुळे चर्चेत आहे. Tv9 ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारनं त्याच्या 'प्रहार' सिनेमातील भूमिकेबद्दल आणि ललित प्रभाकरबद्दल भाष्य केलंय.

Rajkummar Rao : मराठीतला लव्हरबॉय तरी...ललित प्रभाकरच्या कसाबच्या भूमिकेबद्दल राजकुमार रावचं वक्तव्य
| Updated on: Oct 07, 2026 | 5:27 PM

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी ‘प्रहार’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. सिनेमामध्ये राजकुमारनं उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली असून या भूमिकेत तो अत्यंत आकर्षक दिसत आहे. ‘प्रहार‘ या सिनेमात ललित प्रभाकरनं अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. अशातच आता ‘Tv9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार रावनं ललित प्रभाकरबद्दल भाष्य केलं आहे.

‘प्रहार‘ सिनेमाबद्दल बोलताना राजकुमार राव म्हणाला की, ’26/11 चा हल्ला झाला तेव्हा मी मुंबईत नवीनच होतो, त्यावेळी मी बातम्यांमध्ये उज्ज्वल निकम यांच्याबद्दल वाचून होतो. पण भविष्यात त्यांच्याच भूमिकेची ऑफर मला मिळेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यातही दूरदूरपर्यंत आमच्यात काहीच साम्य नाही, मग ते शरीरयष्टीच्या बाबत असो किंवा आवाजाच्या बाबतीत. प्रेक्षकांना स्क्रीनवर उज्ज्वल निकम यांचंच आयुष्य दिसावं, यासाठी मी पूर्ण मेहनत घेतली आहे.’

Loading...

‘उज्ज्वल निकम यांचे कोर्टातील संवाद थेट तसेच घेतले नाहीत, थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. उज्ज्वल निकम यांचं आयुष्यच रोलर-कोस्टर आहे. खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारित हा कोर्टरुम ड्रामा आहे. 26/11 च्या घटनेत त्या 3 दिवसांत काय झालेलं, हे सर्वांनाच माहीत आहे. पण कोर्टरुममध्ये काय झालं, याची सविस्तर माहिती कोणालाच नाही. कसाब कोणते हातखंडे वापरायचा, सर त्याला कसे ब्रेक करायचे, याची छोटी झलक ट्रेलरमध्ये दाखवली. यात अनेक कमालीचे आणि तितकेच हृदयस्पर्शी डायलॉग आहेत. आपल्याला जागतिक स्तरावर त्याचं पितळ उघड करायचं होतं. क्रॉर बॉर्डर दहशतवाद होतोय, ही गोष्ट जगासमोर मांडायची होती. कोर्टात काय घडलं, हीच अनटोल्ड स्टोरी आहे. मी अमिताभ बच्चन यांचा बंगला पहायला होतो, अशी कसाबची कबुली होती.’

ललितबद्दल काय म्हणाला राजकुमार राव?

ललित प्रभाकरबद्दल बोलताना राजकुमार म्हणाला की, ‘ललित प्रभाकरने उत्तम काम केलंय. महाराष्ट्रात त्याने खूप काम केलंय, मराठीतला लव्हरबॉय इमेज आहे त्याची, ही इमेज ब्रेक करून अशी भूमिका स्वीकारणं, ज्याचा संपूर्ण देश द्वेष करतो, हे वाखण्ण्याजोगं आहे. थिएटरमध्ये प्रेक्षक ‘भारत माता की जय’च्या घोषणा देतील, असा मला विश्वास.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us