Govinda: तू काही केलंस तरी सुनीता तुला..; कोमलसोबत लालबागचं दर्शन घेणाऱ्या गोविंदाला अभिनेत्रीने सुनावलं

Govinda: अभिनेता गोविंदा याने लालबागच्या राजाचं दर्शन अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत घेतलं. ज्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता एका अभिनेत्रीने गोविंदा याला चांगलंच सुनावलं आहे.

Govinda: तू काही केलंस तरी सुनीता तुला..; कोमलसोबत लालबागचं दर्शन घेणाऱ्या गोविंदाला अभिनेत्रीने सुनावलं
| Updated on: Sep 24, 2026 | 3:13 PM

Govinda: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याला लालाबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्यानंतर स्पॉट करण्यात आलं. पण अभिनेत्यासोबत कथित गर्लफ्रेंड आणि  को – स्टार कोमल राणी स्वर्णकार ही देखील होती. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता  राखी सावंत हिने मोठं वक्तव्य केलं आहे. व्हिडीओ पोस्ट करत राणी हिने  गोविंदा हिला चांगलंच सुनावलं आहे… राखीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय, ‘अरे चीची भैय्या… गोविंदा तुला झालं तरी काय आहे? लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आणि ते देखील त्या रुपा कोमलसोबत… कोण आहे ती? कोमलसोबत गेलास? हे फार चुकीचं आहे. तू तुझ्या बायकोसोबत जायला हवं होतं… जिने तुझ्यासोबत 40 वर्ष संसार केला आहे. सुनीता हिच्यासोबत तुला जायला हवं होतं. मी आजपर्यंत तुझ्यासोबत होती, पण हे फार वाईट आहे… तु तर माझा खूप चांगला मित्र आहे. ही फार वाईट गोष्ट आहे. सुनीता हिला का घेऊन का नाही गेला?’ सध्या राखीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

ही पहिली वेळ नाही जेव्हा,  राखी हिने गोविंदावर निशाणा साधला आहे. याआधी देखील राखीने गोविंदाला चांगलंच सुनावलं आहे. राखी सावंत हिच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात, गोविंदाच्या पत्नीने सांगितलं की, गोविंदा यांचं दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्याचं नियोजन होतं. तेव्हा राखी म्हणालेली, सर्वात आधी 200 कोटींची संपत्ती स्वतःच्या नावावर करुन घे. नाही तर दुसरीच संपत्तीवर हक्क सांगेल… तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला.

सुनीता यांनी गोविंदा आणि कोमलविषयी पसरणाऱ्या अफवांवर भाष्य केलं होतं. कोमलसोबत गोविंदाला पाहिल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सुनीता पापाराझींना म्हटलं होतं, “विनाश काले विपरीत बुद्धि,” ज्यावरून या प्रकरणावर तिचा राग दिसून आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us