बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीने धर्म बदलला? हिजाबमधील व्हिडीओ पोस्ट करून केली दुआ; याआधी चक्क…

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला हिला नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस पेहरावात पाहिलं असेल, पण आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून ती बुरखा आणि हिजाबमध्ये दिसली. तो व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीने धर्म बदलला? हिजाबमधील व्हिडीओ पोस्ट करून केली दुआ; याआधी चक्क...
| Updated on: Aug 29, 2026 | 8:59 PM

एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं की एकच नाव समोर येतं.. ते राखी सावंत हिचं. बोल्ड अंदाज, बिनधास्त वक्तव्य आणि स्पष्टवक्तेपणासाठी राखी अतिशय फेमस आहे. पण सध्या राखी सावंत ही उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली आहे. राखीचे मक्कामधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून ती चाहत्यांना अपडेट असते. रक्षाबंधनच्या खास दिवशी तिने नेपाळमधील पूरग्रस्त लोकांसाठी आणि देशातील Gen-Z साठी मक्का येथे प्रार्थना केली. एवढंच नव्हे तर आता हीच अभिनेत्री बाहेर लोकांना जानमाज (मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी वापरतात ती चटई किंवा गालिचा) वाटतानाही दिसून आली. राखीचे हे व्हिडीओ समोर आल्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स देत बऱ्याच कमेंट्सही केल्या.

बुरखा आणि हिजाबमधील राखीचा व्हिडिओ व्हायरल

राखी सावंतचे मक्केतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखी मक्केत लोकांना जानमाज वाटताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राखीने बुरखा आणि हिजाब परिधान केला असून ती डोक्यापासून पाय संपूर्णपणे झाकलेले, अशा पेहरावात ती दिसली. खरंतर नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या राखीला नो-मेकअप लूकमध्ये आणि पूर्ण कपड्यांमध्ये पाहून अनेक युजर्सनी आश्चर्यही व्यक्त केलं. दरम्यान, राखी जेव्हा जानमाज वाटत होती, तेव्हा लोकांनी मोठी गर्दी करत तिला घेरलं. गर्दीत अडकल्यामुळे ती एका क्षणी घाबरलेली दिसली. मात्र, त्यानंतर तिने स्वतःला सावरत शांतपणे परिस्थिती हाताळली.

नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी, अडकलेल्या लोकांसाठी केली प्रार्थना

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये राखीने सांगितलं की, तिच्याकडे 100 हून अधिक जानमाज आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले असून, तेथील लोकांसाठी अल्लाहकडे दुआ मागितल्याचही राखीने यावेळी सांगितलं. राखी म्हणाली की, नेपाळमध्ये पाण्याची परिस्थिती नियंत्रणात आली असून अनेकांचे जीव वाचले आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे मक्का येथे लोकांना जानमाज वाटत असल्याचं तिने सांगितलं.

राखीचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. तिच्या या कृतीचं काही सोशल मीडिया युजर्सनी कौतुक केलं. मात्र हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावरून काही जणांनी तिच्यावर टीकाही केली.

लग्नासाठी राखीने बदलला धर्म

मिळालेल्या माहितीनुसार, आदिल खान दुर्रानीसोबत दुसरे लग्न करण्यापूर्वी राखी सावंतने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तिचं नाव फातिमा ठेवण्यात आलं होतं. नंतर आदिलसोबत तिचा घटस्फोट झाला. मात्र, राखी अजूनही इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं सांगते. राखी यापूर्वीही अनेक वेळा उमराहसाठी मक्केत गेली आहे. आता ती पुन्हा तिथे पोहोतली अलून तिचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं दिसून आलं.

Follow Us