
मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी खान नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. विशेष म्हणजे काही दिवस आपल्या लग्नाची गोष्टी राखी सावंत हिने सर्वांपासून चक्क लपवून ठेवली होती. राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला होता. लग्नानंतर राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे ठेवले.
राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच आपला पती आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. हे प्रकरण थेट कोर्टात पोहचले आणि आदिल दुर्रानी याला चक्क काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ आली. आता नुकताच आदिल दुर्रानी हा जेलमधून बाहेर आलाय. यानंतर एक प्रेस घेत आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले आहेत.
आदिल दुर्रानी याने केलेल्या आरोपांनंतर राखी सावंत हिने देखील एक प्रेस घेतली. यामध्ये आदिल दुर्रानी याने केलेल्या आरोपांवर उत्तर देताना राखी सावंत ही दिसली. यावेळी बोलताना राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आदिल दुर्रानी हा माझ्यामुळे सहा महिने जेलमध्ये नव्हता. मी त्याच्यावर जे आरोप केले त्यानंतर तो फक्त 22 दिवस जेलमध्ये होता.
आदिल दुर्रानी याच्या इराणी गर्लफ्रेंडने त्याच्यावर रेपची केस दाखल केली आणि त्यामुळे तो सहा महिने जेलमध्ये होता. आदिल दुर्रानी हा सरळ सरळ खोटे बोलत आहे. इतकेच नाही तर मी घरी नसताना तो मुलींना घरी आणत होता. मला ही गोष्ट कळाली. त्याने मला दुबईमध्ये आणि मुंबईमध्ये देखील मारहाण केली आहे. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते.
आदिल दुर्रानी याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना राखी सावंत ही म्हणाली की, त्याची जी गर्लफ्रेंड होती ती पाच वर्षे त्याच्यासोबत राहत होती. मात्र, आदिल दुर्रानी याने तिला आमच्या लग्नाबद्दल काहीच सांगितले नव्हते. त्याने मला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला देखील खोटे बोलला होता. त्याने मला सांगितले होते की, ती त्याची मैत्रीण आहे.
आता आदिल दुर्रानी आणि राखी सावंत हे एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. आदिल दुर्रानी याने काही व्हिडीओ देखील आपल्याकडे असल्याचा दावा हा केला आहे. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर राखी सावंत आणि तिचा पहिला पती रितेश यांचा घटस्फोट झाला नसल्याचे देखील आदिल दुर्रानी याने म्हटले आहे.