Abhishek Awasthi : मी रात्रभर…राखी सावंतनं लगावलेली कानशिलात अन् केलेला ब्रेकअप; अनेक वर्षांनी अभिनेत्यानं व्यक्त केलं दुःख

Abhishek Awasthi On Rakhi Sawant : अभिनेता अभिषेक अवस्थीनं राखी सावंतसोबतच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

Abhishek Awasthi : मी रात्रभर...राखी सावंतनं लगावलेली कानशिलात अन् केलेला ब्रेकअप; अनेक वर्षांनी अभिनेत्यानं व्यक्त केलं दुःख
| Updated on: Nov 19, 2026 | 9:33 PM

ड्रामा क्वीन राखी सावंतचं आयुष्य म्हणजे एक खुलं पुस्तक आहे. तिचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं आहे. राखी अभिनेता-कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘नच बलिये ३’ मध्ये त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली. शो संपला आणि त्यानंतर लगेचच त्यांचं नातंही संपलं. इतकंच नाही, तर राखीनं राष्ट्रीय टेलिव्हिजनवर अभिषेकला कानशिलात लगावली होती. अनेक वर्षांनंतर, अभिषेकनं त्यांच्या नात्यामागचं सत्य उघड केलं आहे.

काय म्हणाला अभिषेक अवस्थी?

Loading...

शुभोजित घोषला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, ‘त्या दिवशी मी रात्रभर रडत होतो. मी घर सोडल्यावर खूप दिवस झाले होते. जेव्हा कधी मोलकरीण यायची, तेव्हा मी माझ्या खोलीत जायचो किंवा बाथरूममध्ये बसायचो. मी जगाला कसा सामोरा जाणार, हा विचार माझ्या मनात येत होता. तिनं मला कशी कानशिलात मारली, हे सगळ्यांनी न्यूज चॅनलवर पाहिलं होतं. त्यानंतर माझ्यासाठी जगाला सामोरा जाणं अत्यंत कठीण झालं.’

 

राखी सोबतच्या नात्यात दुरावा

अभिषेक म्हणाला, ‘पण मग मी बाहेर येण्याचं धाडस केलं. मला काम करायचंच होतं. मला या एका गोष्टीवरून माझं आयुष्य संपवायचं नव्हतं.’ जवळपास तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर, अभिषेक आणि राखीच्या नात्यात दुरावा आला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, अभिषेक राखीसाठी फुलं आणि एक टेडी बेअर घेऊन गेला होता, पण राखीनं मीडियासमोरच त्याला कानशिलात मारली. या घटनेमुळे त्यांचं नातं तुटलं. 2021 मध्ये बिग बॉस 14 दरम्यान, राखीनं अभिषेकवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता, पण हा आरोप अभिषेकनं निराधार असल्याचं सांगून फेटाळून लावला.

 

दरम्यान, 2009 मध्ये राखी सावंतनं ‘राखी का स्वयंवर’ हा रिअॅलिटी शो केला होता. या कार्यक्रमात तिनं लग्नासाठी जोडीदार निवडण्याचा निर्णय घेतला. अनेक स्पर्धकांमधून तिनं कॅनडातील एलेश परुजनवाला याची निवड केली. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. काही काळानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us