
RRR फेम अभिनेता रामचरणच्या घरात या वर्षी जून महिन्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी त्यांच्या मुलीचं नाव क्लीन कारा असं ठेवलंय. चिमुकल्या क्लिन कारासोबत उपासनाने तिचा पहिला वरलक्ष्मी व्रत केला आहे.

उपसनाने सोशल मीडियावर वरलक्ष्मी व्रतचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती मुलीला घेऊन बसल्याचं पहायला मिळत आहे. तर तिच्या बाजूला वरलक्ष्मी व्रतासाठी देवीची मांडणी केल्याचं दिसून येत आहे. क्लिन कारा ही आता दोन महिन्यांची झाली आहे.

'मी यापेक्षा अधिक काहीच मागू शकत नाही. क्लिन कारासोबत माझासुद्धा पहिला वरलक्ष्मी व्रत', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. हाच फोटो रामचरणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

उपासना आणि रामचरणने 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर उपासनाने मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी क्लिन कारा असं ठेवलं. एका देवीच्या नावावरून हे नाव ठेवल्याचं रामचरणने स्पष्ट केलं.

दक्षिण भारतात वरलक्ष्मी व्रताचं खूप महत्त्व आहे. लग्न झालेल्या हिंदू महिला ही पूजा करतात. यामध्ये देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. वरलक्ष्मी व्रतालाच वरलक्ष्मी पूजा असंही म्हटलं जातं.