AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये भारत आतापर्यंत या 2 टीम्स विरुद्ध कधीच जिंकू शकलेला नाही, अन्य टीम्स विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?

India Record T20 World Cup : भारतीय टीमचा T20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे? कुठल्या संघाविरुद्ध टीम इंडियाचं प्रदर्शन कसं आहे? असे दोन संघ आहेत, ज्यांच्याविरुद्ध भारत अजूनपर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये जिंकू शकलेला नाही.

T20 World Cup मध्ये भारत आतापर्यंत या 2 टीम्स विरुद्ध कधीच जिंकू शकलेला नाही, अन्य टीम्स विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?
Suryakumar Yadav Image Credit source: PTI
| Updated on: Feb 03, 2026 | 12:08 PM
Share

T20 World Cup 2026 चा शंखनाद व्हायला आता फार वेळ उरलेला नाही. 7 फेब्रुवारीपासून ICC टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापूर्वी भारत 4 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या तयारीची फुल अँण्ड फायनल चाचणी करेल. भारत यंदाचा यजमान असून गतविजेता आहे. त्याशिवाय किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार सुद्धा आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिल्यांदा 20 टीम्स सहभागी होत आहेत. टीम इंडियाचा कोणाविरुद्ध काय रेकॉर्ड आहे हे तुम्हाला माहितीय का? यात 2 दोन टीम अशा आहेत, ज्यांच्या विरुद्ध भारत कधीच जिंकलेला नाही.

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये ज्या दोन टीम विरुद्ध आजपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही, यात एक आहे श्रीलंका आणि दुसरी आहे न्यूझीलंड. टी 20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत आतापर्यंत दोन सामने खेळलाय. दोघांमध्येही पराजय झालाय. त्याशिवाय न्यूझीलंड विरुद्ध तिनही सामन्यात पराजय झालाय.

याआधीची मॅच भारताने जिंकलेली

टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिला सामना USA विरुद्ध आहे. त्यांच्या विरुद्ध भारताचा रेकॉर्ड टुर्नामेंटमध्ये 100 टक्के विजयाचा आहे. T20 वर्ल्ड कपच्या पीचवर भारत आणि USA मध्ये दुसऱ्यांदा मॅच होणार आहे. याआधी झालेला एक सामना भारताने जिंकला होता.

आतपर्यंत दोन्ही देश 8 वेळा आमने-सामने आले

पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. असं करुन पाकिस्तान खरोखर बांग्लादेशला सपोर्ट करतोय की, भारताविरुद्ध हरण्याची भिती त्यांच्या मनात आहे, हा प्रश्न निर्माण होतो. असं आम्ही यासाठी म्हणतोय कारण भारताविरुद्ध T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा इतिहास खूप वाईट आहे. आतपर्यंत दोन्ही देश 8 वेळा आमने-सामने आले. यात 7 वेळा भारताने पाकिस्तानला धूळ चारली. म्हणजे 7-1 ने भारताचं पारडं जड आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा रेकॉर्ड काय?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं जय-पराजयाचं अंतर 5-2 चं आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या आहेत. यात पाचवेळा भारताने बाजी मारलीय. दोनवेळा दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकलीय. अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजयाचा रेकॉर्ड 100 टक्के आहे. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 4 वेळा सामना झालाय. प्रत्येकवेळी भारताने अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवला आहे. म्हणजे 4-0 ने भारताचं पारडं जड आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेकॉर्ड कसा आहे?

ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघाविरूद्धही भारताने आपला रेकॉर्ड दमदार ठेवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचं 4-2 ने पारडं जड आहे. आतापर्यंत 6 वेळा दोन्ही टीम्स आमने-सामने आल्यात. यात चार वेळा भारत जिंकलाय. दोनवेळा ऑस्ट्रेलिया.

Follow Us
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.