AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp चे जबरदस्त फीचर; आता नंबर शेअर न करता करा चॅट, बिनधास्त मारा गप्पा

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲपने नवीन फीचर रोलआऊट केले आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला विना मोबाईल नंबर शेअर करता समोरील व्यक्तीशी हितगुज साधता येईल. गप्पा मारता येतील आणि चॅटिंग करता येईल. काय आहे हे नवीन मॅसेजिंग फीचर?

WhatsApp चे जबरदस्त फीचर; आता नंबर शेअर न करता करा चॅट, बिनधास्त मारा गप्पा
WhatsApp New FeatureImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 10, 2026 | 4:36 PM
Share

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲपने युझर्ससाठी अजून एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. लवकरच तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे फीचर येईल. त्यासाठी हे व्हॉट्सॲप तुम्हाला अपेडट करावे लागेल. या मॅसेजिंग फीचर्सनुसार, युझर्स आता विना मोबाईल शेअर करता एकमेकांशी गप्पा मारू शकतील. चॅटिंग करू शकतील आणि त्यासाठी मोबाईल नंबरची गरज राहणार नाही. मेटा कंपनीने इन्स्टाग्राम सारखेच Username फीचर आणले आहे. त्यामुळे युझर्सची खासगी सुरक्षा अबाधित राहील .

युझरनेम फीचरमुळे खासगीपण जपता येतील

या नवीन फीचरमुळे युझर्स त्यांच्या खात्यासाठी एक युनिक युझरनेम तयार करू शकतील. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक शेअर करण्याऐवजी केवळ युझरनेमद्वारे चॅटिंग करू शकतील. यामुळे खासकरून त्या लोकांना फायदा होईल जे त्यांची खासगी सुरक्षा उघड करू इच्छित नाही. अनेकांना त्यांचे खासगीपण जपता येईल.

हे फीचर लवकरच सर्वांच्या मोबाईलमध्ये

एका वृत्तानुसार, WhatsApp ने हे फीचर सध्या काही युझर्सपुरतेच रोलआऊट केले आहे. तर येत्या काही आठवड्यात व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे फीचर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल. हळूहळू हे फीचर प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपमध्ये दिसू लागेल. त्याआधारे तुम्हाला युझरनेम तयार करून जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारता येतील. चॅटिंग करता येईल.

Username कसं तयार करणार?

जर तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये हे फीचर दिसत असेल तर तुम्ही सहज तुमचे युझरनेम सेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप च्या प्रोफाईल सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला युझरनेम तयार करण्याचा पर्याय दिसू लागेल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉलो करून युझरनेम सेट करता येईल. युझरनेम तयार करण्यासाठी कमीत कमी एका अक्षराचा वापर करणे आवश्यक आहे. केवळ छोटे अक्षर, क्रमांक, डॉट आणि रेषा याचा ही युझरनेम तयार करण्यासाठी वापरता येईल.

युझरनेम कमीत कमी 3 ते 35 कॅरेक्टर दरम्यान असायला हवा. पण युझरनेम कधीही www. या नावाने सुरू करता येऊ शकत नाही. तर डॉट com वा डॉट net हे नावाच्या मागे पुढे वापरता येणार नाही. या नवीन फीचरची माहिती ही बीटा ट्रॅकर wabetainfo ने दिली आहे.

Follow Us
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?