‘हो गई बोलती बंद?’, अक्षय कुमारबद्दल रामचरणचं वक्तव्य ऐकून चाहते थक्क!

| Updated on: Nov 14, 2022 | 11:45 AM

अक्षय कुमारच्या चित्रपटांबद्दल रामचरण म्हणाला असं काही.. चाहते करू लागले कमेंट्सचा वर्षाव

हो गई बोलती बंद?, अक्षय कुमारबद्दल रामचरणचं वक्तव्य ऐकून  चाहते थक्क!
रामचरण, अक्षय कुमार
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली- बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार आणि टॉलिवूडचा सुपरस्टार रामचरण यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी दोघांमध्ये छान गप्पा रंगल्या आणि त्यांनी एकत्र डान्ससुद्धा केला. याच कार्यक्रमात अक्षय कुमारने त्याच्या चित्रपटांवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तर दुसरीकडे रामचरणने अक्षयच्या चित्रपटांबद्दल असं काही वक्तव्य केलं.. जे ऐकून नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या कार्यक्रमात रामचरणला RRR या चित्रपटाच्या इन्ट्रो सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल सांगताना तो म्हणाला, “तो सीन शूट करण्यासाठी आम्हाला 35 दिवस लागले. सर्वसामान्यपणे एवढ्या दिवसांत काही चित्रपटांची पूर्ण शूटिंग होऊन जाते”.

हे म्हणत असतानाच रामचरण अक्षयकडे बघतो आणि म्हणतो, “मी असं ऐकलंय की अक्षय सर 40 दिवसांत चित्रपटाची शूटिंग पूर्ण करतात.” त्यावर हसत अक्षयसुद्धा उत्तर देतो. “शूटिंग संपतं तेवढ्या दिवसांत, मी काय करू?”, असं तो म्हणतो.

हे सुद्धा वाचा

अक्षय आणि रामचरणसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा हसू लागतात. याच व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रामचरणने अप्रत्यक्षपणे अक्षयवर निशाणा साधला आहे, असं काहीजण म्हणत आहेत. तर काही नेटकरी RRR च्या कामाचं कौतुक करत आहेत.

‘म्हणूनच RRR या चित्रपटाने 1100 कोटी रुपयांची कमाई केली’, असं एका युजरने म्हटलं. तर ‘रामचरणने अक्षयला छान उत्तर दिलं’, असं दुसऱ्याने लिहिलं. ‘मी RRR चा चाहता नाही, पण त्या सीनमध्ये मला रामचरणचं अभिनय खूप आवडलंय’, अशा शब्दांत नेटकऱ्याने कौतुक केलं.

धुळीची ॲलर्जी असतानाही रामचरणने संबंधित सीनसाठी 35 दिवस धुळीत शूटिंग केलं होतं. त्या सीनवर तब्बल 3 ते 4 हजार लोकांनी मेहनत घेतली होती, असंही रामचरणने सांगितलं.

एस. एस. राजामौली यांचा RRR हा बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटावर त्यांनी जवळपास पाच वर्षे मेहनत घेतली. रामचरणसह यामध्ये ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण या बॉलिवूड कलाकारांनीही त्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.