माझ्या बापाने पण एवढं kiss केलं नाही; श्रेयाच्या आरोपांवर राम कपूरच्या पत्नीची प्रतिक्रिया

रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये सध्या खळबळ माजली आहे. 52 वर्षीय राम कपूरवर स्पर्धक श्रेया भडकली आहे. तिने राम कपूरचे कृत्य पाहून माझ्या बापाने पण एवढं kiss केलं नाही असे म्हटले आहे. त्यावर आता राम कपूरच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या बापाने पण एवढं kiss केलं नाही; श्रेयाच्या आरोपांवर राम कपूरच्या पत्नीची प्रतिक्रिया
Ram Kapoor Wife
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 6:05 PM

नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये प्रत्येक नवीन टास्कसोबत स्पर्धकांमधील संबंध बदलताना दिसत आहेत आणि अनेक स्पर्धक एकमेकांवर उघड उघड आरोप करत आहेत. आता याच दरम्यान ३० वर्षीय स्पर्धक श्रेया कालराने ५२ वर्षीय राम कपूर यांच्यावर वैयक्तिक मर्यादा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी रागाच्या भरात म्हटले की, राम कपूर यांनी पुन्हा त्यांना किस करण्याचा प्रयत्न केला तर त्या त्यांना स्पष्ट शब्दांत सांगतील की, “माझे पप्पाही मला इतके किस करत नाहीत.” आता यावर राम कपूरच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.

राम कपूर यांच्या पत्नीने सोडले मौन

राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने देखील यावर प्रतिक्रिया देत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्यात ती म्हणाली, “मी ठरवले होते की, ‘लॉक अप’ शोबाबत मी काही बोलणार नाही. पण गेल्या २-३ दिवसांतील प्रकार पाहून मी शांत राहू शकले नाही. म्हणून मी माझ्या पतीच्या समर्थनार्थ समोर आले आहे. अनेक जण त्यांना ‘ठरकी’ म्हणत आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते की, ते असेच आहेत. मी त्यांचा बचाव करत नाही, ते खरोखरच हृदयवान माणूस आहेत. ते गेम शोसाठी गेले आहेत, जिथे रिअॅलिटी दाखवायची आहे, कोणताही प्लॅन किंवा स्ट्रॅटर्जीशिवाय. म्हणून हे घडत आहे.”

“एखाद्या व्यक्तीला खरोखर जवळून ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल अंदाज लावणे किती सोपे आहे! राम कपूर नेहमीच दयाळू आणि प्रेमळ राहिले आहेत, मग ती स्त्री असो की पुरुष. त्यांनी असंख्य लोकांची मदत केली आहे आणि आम्हाला त्यांच्या दुआ मिळाल्या आहेत, म्हणून हा कठीण काळही निघून जाईल. मी आज आणि नेहमी त्यांच्या सोबत आहे. खेळ फक्त मनाने नव्हे, तर मेंदूनेही खेळा” या आशयाचे कॅप्शन गौतमी कपूर यांनी दिले आहे.

नेमका वाद काय?

“जेव्हा शिवांगी टास्क करत होती, तेव्हा राम कपूर तिच्या खूप जवळ गेले होते. त्यावेळी हर्षदने त्यांना दूर केले. राम तिथून बाजूला झाल्यावर हर्षद त्यांची माफी मागत होता. पण कशासाठी सॉरी? तो माणूस समोरच्याच्या तोंडावर येऊन थुंकतोय, हे त्याच्या तोंडावर सांगायला हवं. थोड्या तरी मर्यादा ठेवा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने वागत राहता. मी तुझ्यासाठी तीन टास्क जिंकले. पण माझ्या बाजूने उभं राहण्यासाठी तुझा एक हातही वर होत नाही. तू घाबरट आहेस. अशा सीनियर व्यक्तीचा मी आदर का करू? अशा सीनियरिटीवर थू आहे. जर फराह मॅडम मला विचारतील की मी असं का बोलले, तर मी त्याचं कारण सांगेन. यावर फक्त थू थू थू आहे. आणि जर यावेळी त्यांनी मला kiss करण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांचा चेहरा पकडून सांगेन – माझे वडीलसुद्धा मला इतक्या वेळा किस करत नाहीत, त्यामुळे आता असं करू नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us