Ramayan : कैकेयी-मंथरेची पहिली झलक ! लारा दत्ता, शीबा चढ्ढा यांच्या भूमिकेची चर्चा

Ramayan : रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा मल्टीस्टारर चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चित्रपटातील लारा दत्ता आणि शीबा चढ्ढाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Ramayan : कैकेयी-मंथरेची पहिली झलक !  लारा दत्ता, शीबा चढ्ढा यांच्या भूमिकेची चर्चा
| Updated on: Oct 10, 2026 | 2:45 PM

Ramayan : 2026 सालातील सर्वांत चर्चित चित्रपटांमध्ये रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चं नाव आहे. ग्लोबल स्टँडर्डवर तयार करण्यात येणारी ही मेगा-फिल्म यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा प्रोड्यूसर नमित मल्होत्राने नुकतंच या चित्रपटाच्या ग्रँड बजेटबद्दल सांगितलं होतं, तब्बल 4 हजार कोटींमध्ये हा चित्रपट बनलाय. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर समोर आल्यावर सोशल मीडियावर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.विशेषत: व्हीएफएक्स (VFX)च्या वापरावरून सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला खूप ट्रोल करण्यात आलं. याचदरम्यान आता मेकर्सनी या चित्रपटातील अत्यंत महत्वाच्या अशा दोन कलाकारांची ऑफिशिअल पोस्टर्स जारी केली आहेत.

नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक समोर येत असताना आता अभिनेत्री लारा दत्ता आणि शीबा चड्ढा यांच्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लारा दत्ता राणी कैकेयीच्या भूमिकेत दिसत असून, तिचा गंभीर आणि प्रभावी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. तर, शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading...

कैकेयी आणि मंथराचा फर्स्ट लूक रिलीज

‘रामायण’च्या निर्मात्यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लारा दत्ता आणि शीबा चड्ढा या दोघींचे फर्स्ट लूक शेअर केले आहेत. या पोस्टमधील कॅप्शनमधून दोन्ही पात्रांचं कथानकातील महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. लारा दत्ता हिने साकारलेल्या, कैकेयी या पात्राचे वर्णन करताना निर्मात्यांनी एका राणीची, एका आईची आणि दोन वरदानांची कथा मांडली आहे. या दोन वरदानांमुळे रामाचे आयुष्य आणि त्याचे भविष्य कायमचे बदलणार असल्याचे कॅप्शनमधून सूचित करण्यात आलंय.

दुसरीकडे, शीबा चड्ढा यांच्या मंथरा या पात्राचे वर्णन धूर्त बुद्धी आणि कुजबुजीमुळे घडणाऱ्या घटनांशी जोडण्यात आले आहे. मंथरेच्या प्रभावामुळे एका आईच्या प्रेमाला आणि संपूर्ण साम्राज्याच्या भवितव्याला वेगळी दिशा मिळते, अशी या पात्राची झलक पोस्टमधून पाहायला मिळते. दोन्ही अभिनेत्रींच्या लूकमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

लारा दत्त आणि शीबा किती श्रीमंत ?

लारा दत्ता या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच ती व्यावसायिक क्षेत्रातही सक्रिय आहे. उपलब्ध मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका चित्रपटासाठी किंवा प्रोजेक्टसाठी सुमारे 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते, असा अंदाज व्यक्त केला जातो. लारा दत्ता हिचा ‘Arias’ हा स्किनकेअर ब्रँड असून, ती विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही कमाई करतात. मुंबईतील वांद्रे परिसरातील पाली हिल येथे तिचं आलिशान घर असल्याचंही सांगितलं जातं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लारा दत्ताची एकूण संपत्ती अंदाजे 60 ते 68 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो.

शीबा चड्ढा या हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अनेक चित्रपट आणि लोकप्रिय वेब सीरिजमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. चित्रपट आणि वेब सीरिजसोबतच त्यांनी रंगभूमीवरही दीर्घकाळ काम केले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीबा चड्ढा यांची एकूण संपत्ती अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us