Ramayana Box Office Collection Day 22: आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ची जादू ओसरली? 1000 कोटींच्या अगदी जवळ येऊन सिनेमा मंदावला

Ramayana Box Office Collection Day 22: तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला 'रामायण' सिनेमाची जादू आता ओसरताना दिसत आहे. 1000 कोटी रुपयांचा टप्पा सिनेमा आता पार करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ramayana Box Office Collection Day 22: आदिनाथ कोठारेच्या रामायणची जादू ओसरली? 1000 कोटींच्या अगदी जवळ येऊन सिनेमा मंदावला
Ramayana
| Updated on: Nov 27, 2026 | 7:56 AM

Ramayana Box Office Collection Day 22: दिग्दर्शत नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana) सिनेमा गेल्या तीन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. पण आता चौथ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावताना दिसत आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने चांगली कमाई केली. त्यानंतर दिवाळी असल्यामुळे सिनेमाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली. पण त्यानंतर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. पण आता सिनेमाच्या कमाईचा आकडा खाली घसरत आहे. ‘रामायण’ सिनेमाच्या 22 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील आता समोर आले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

‘रामायण’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Loading...

सांगायचं झालं तर, बुधवारी सिनेमाच्या कमाईत मोठी घट दिसून आली. 21 व्या दिवशी सिनेमाने सर्वात कमाई केली. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 21 व्या दिवशी सिनेमाने 9.5 कोटी रुपयांची कमाई केली. आता 22 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईचे आकडे जाणून तुम्हाला मोठा धक्काच बसेल. कमाईचे आकडे पाहता सिनेमा किती कोटी कमावेल अशी चर्चा रंगली आहे.

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेडनुसार, अभिनेता आदिनाथ कोठारे याच्या ‘रामायण’ या पौराणिक सिनेमाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 22 व्या दिवशी 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, ग्रॉस कलेक्शन सुमारे 9.30 कोटी रुपये इतकं आहे. अंतिम आकडेवारी यापेक्षा जास्तही असू शकते. सध्या तरी, गुरुवारचं ‘रामायण’चं कलेक्शन आतापर्यंतचे सर्वात कमी राहिलं आहे.

‘ये प्रेम मोल लिया’चा होणार परिणाम?

सांगायचं झालं तर, 27 नोव्हेंबर रोजी सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’ हा कौटुंबिक सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे शुक्रवारी देखील आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या या सिनेमाचा परिणाम ‘रामायण’च्या कमाईवर दिसून येऊ शकतो. मात्र, वीकेंडला या पौराणिक सिनेमाच्या कमाईत पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळेल, असं शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us