Ramayana Box Office Collection: आदिनाथ कोठारेची हवा! ‘रामायण’ सिनेमाने 23व्या दिवशी रचला इतिहास

Ramayana Box Office Collection: 'रामायण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 23व्या दिवशी इतिहास रचला असल्याचे समोर आले आहे. आता नेमकं काय केलं? वाचा...

Ramayana Box Office Collection: आदिनाथ कोठारेची हवा! रामायण सिनेमाने 23व्या दिवशी रचला इतिहास
Ramayana Box Office Collection Day 23
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 7:35 AM

नितेश तिवारी यांचा सिनेमा ‘रामायण’ रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडताना दिसत आहे आणि एकामागून एक नवीन रेकॉर्ड्स करत असल्याचे दिसत आहे. हा सिनेमा आतापर्यंतचा तिसरा ऑल टाइम वर्ल्डवाइड हायेस्ट ग्रॉसर इंडियन फिल्म बनला आहे. त्याचबरोबर २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या दुसऱ्या फिल्मचा रेकॉर्डही या सिनेमाच्या नावे करण्यात आला आहे. आता या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे करुन घेतला आहे.

‘रामायण’ चित्रपटाच्या रिलीजला २३ दिवस झाले आहेत आणि या काळात चित्रपटाने जगभरात तसेच भारतातही अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. २३व्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाने भारतातही १००० कोटींच्या नेट कलेक्शनचा आकडा पार केला आहे. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा बॉलिवूडचा दुसरा चित्रपट ठरला आहे. वाचा कलेक्शनविषयी…

Loading...

वाचा: 48 वर्षांपूर्वीचे गाणे सीरिजमध्ये दिसले, किशोर कुमार यांच्या गाण्याची पुन्हा चर्चा! ब्रेकअप झालेल्यांच्या लिस्टमध्ये

‘रामायण’चे डे-२३ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे आणि चांगले कलेक्शन करून नवीन रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या चित्रपटापुढे कोणताही सिनेमा टिकलेला नाही..

– सॅकनिल्कनुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५६४.६० कोटींचे कलेक्शन केले होते.

– दुसऱ्या आठवड्यात २९९.१५ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात १२८.३५ कोटींचे कारोबार केले.

– त्यानंतर २३व्या दिवशी ८.४५ कोटींचा बिझनेस केला.

– चित्रपटाचे एकूण इंडिया नेट कलेक्शन १,०००.५५ कोटी झाले आहे.

– तर त्याचे इंडिया ग्रॉस कलेक्शन १,१९५.१० कोटी झाले आहे.

‘रामायण’ बनला १००० कोटी कमावणारी बॉलिवूडचा दुसरा सिनेमा

‘रामायण’ने भारतात १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून मोठा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. तो बॉलिवूडचा दुसरा १००० कोटीची कमाई करणारा सिनेमा बनला आहे. हा रेकॉर्ड करणारा पहिला सिनेमा ‘धुरंधर २’ होता, ज्याचे इंडिया नेट कलेक्शन १००० कोटींपेक्षा जास्त होते.

सर्व भारतीय चित्रपटांमध्ये पाहिले तर नितेश तिवारी यांचा चित्रपट भारतात १००० कोटी नेट कलेक्शन करणारा चौथा चित्रपट बनला आहे. पहिला सिनेमा ‘बाहुबली २’ आणि दुसरा ‘पुष्पा २’ होता. निर्मात्यांसाठी हे मोठे यश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us