Sai Pallavi : रावण वाईट नव्हता, प्रत्येकामध्ये…’रामायण’मध्ये सीता साकारणाऱ्या साई पल्लवीचं मोठं विधान

Sai Pallavi On Ravana : 'रामायण' फेम साई पल्लवीनं नुकत्याच एका कार्यक्रमात रावणाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं असून अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Sai Pallavi : रावण वाईट नव्हता, प्रत्येकामध्ये...रामायणमध्ये सीता साकारणाऱ्या साई पल्लवीचं मोठं विधान
| Updated on: Oct 28, 2026 | 4:40 PM

नितीश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकेत असून हा सिनेमा ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडला. या कार्यक्रमातील साई पल्लवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेड कार्पेटवर संवाद साधतानाचा हा व्हिडिओ असून, त्यात अभिनेत्री चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र, रावणाबद्दल साईनं केलेल्या एका विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

साई पल्लवीचं रावणाबद्दल विधान

Loading...

साई म्हणाली की, ज्यांना भारतीय संस्कृती आणि महाकाव्यांबद्दल कुतूहल आहे, त्यांच्यासाठी हा चित्रपट एक उत्तम सुरुवात ठरू शकतो, कारण हे ‘रामायण’चं सर्वोत्तम रूप आहे. तिनं सांगितलं की, त्यांनी व्हीएफएक्स (VFX) तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर केला असून, त्यांच्या टीममध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञ आहेत. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘एका धार्मिक ग्रंथाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, जर तुमची श्रद्धा असेल, तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकता. तुमच्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखून, काळानुसार स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. कारण रावण पूर्णपणे वाईट नव्हता. आपल्या प्रत्येकामध्ये एक ‘रावण’ दडलेला असतो, तो ओळखून त्यात बदल घडवून आणणं महत्त्वाचं आहे.’

 

 

अभिनेत्रीच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

साईच्या ‘रावण पूर्णपणे वाईट नव्हता’ या विधानावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं ट्विट केलं, ‘एक स्त्री अपहरणकर्त्याचंच कौतुक करत आहे!’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते आणि तिथे त्याचे पुतळे जाळले जात नाहीत. त्यामुळे, ते रावणाच्या स्वभावातील विविध छटा दाखवत असावेत. एका अर्थाने ती बरोबर आहे, तो भगवान शंकराचा भक्त, विद्वान होता, हे त्याचे चांगले पैलू होते. मात्र, त्याचा अहंकार आणि वासना त्याला वाईट मार्गाकडे घेऊन गेली.’ आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘लोकांना प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण करायचा असतो.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us