Ramayana: ‘रामायण’मधील डिलिटेड सीनची तुफान चर्चा; राम-सीता अन् लक्ष्मणाचा थरारक सीन पाहून अंगावर येईल काटा

Ramayana: बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या 'रामायण' या चित्रपटातील एक डिलिटेड सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या सीनमधील प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Ramayana: रामायणमधील डिलिटेड सीनची तुफान चर्चा; राम-सीता अन् लक्ष्मणाचा थरारक सीन पाहून अंगावर येईल काटा
'रामायण'मधील डिलिट केलेला सीन चर्चेत
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2026 | 1:59 PM

Ramayana: ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असताना या सिनेमातील एका हटवलेल्या दृश्याने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित हा थरारक सीन हिंदी व्हर्जनमधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दृश्यात हिंस्र जनावरांच्या हल्ल्यातून प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांचे प्राण वाचवताना दिसतात. हा प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नेमका काय आहे या व्हायरल सीनमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दृश्यानुसार, लक्ष्मणाच्या हाताला दुखापत झाल्यानंतर सीता त्यांना घेऊन एका गुहेत आश्रय घेते. ही गुहा एका धबधब्याच्या मागे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, त्यांचा पाठलाग करत तीन लांडग्यांसारखे दिसणारे हिंस्र जीव तिथे पोहोचतात. त्यांना पाहून सीता घाबरून न जाता स्वतःच्या बचावासाठी शस्त्र उचलते. लक्ष्मणही जखमी असूनही सीतेच्या संरक्षणासाठी पुढे सरसावतात. दोघेही त्या हिंस्र जीवांचा सामना करण्याच्या तयारीत असतानाच प्रभू श्रीरामांची एण्ट्री होते. श्रीराम धनुष्यबाणाच्या साहाय्याने त्या तिन्ही जीवांचा वध करतात आणि सीता – लक्ष्मण यांना संकटातून वाचवतात.

Loading...

पहा व्हिडीओ-

हिंदी व्हर्जनमधून सीन का वगळला?

या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनी ‘रामायण’ चित्रपटाच्या वेगवेगळ्या व्हर्जनमधील फरकांवरही लक्ष वेधलं आहे. काही प्रेक्षकांच्या दाव्यानुसार, हा सीन परदेशात प्रदर्शित झालेल्या हिंदी व्हर्जनमध्ये पाहायला मिळाला; मात्र भारतातील थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी व्हर्जनमध्ये तो नव्हता. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना हा प्रसंग का दाखवण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहींनी चित्रपटाच्या निर्मात्यांना हा सीन पुन्हा समाविष्ट करण्याची विनंतीही केली आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये काही दृश्ये आणि गाणी कमी-जास्त असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, हा विशिष्ट सीन भारतातील आवृत्तीतून नेमका कोणत्या कारणामुळे वगळण्यात आला, याबाबत निर्मात्यांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय यश रावणाची आणि सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहेत. भव्य दृश्यरचना आणि कलाकारांच्या भूमिकांमुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील एका हटवलेल्या सीनमुळे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us