Ramayana: ना सोनं, ना चांदी, ना लोखंड… रणबीर कपूरच्या ‘राम’ कवचासाठी वापरली ही अनोखी गोष्ट; बनवायला लागली साडेतीन वर्षे

रामायण चित्रपटातील भव्य सेट, वेशभूषा आणि दृश्यांबरोबरच रणबीरने परिधान केलेले कवचही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे कवचं पाहिल्यानंतर ते सोनं, चांदी किंवा लोखंडापासून बनवलं असावं असं सुरूवातीला वाटतं. पण प्रत्यक्षात हे कवचं तयार करण्यासाठी अशा काही वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

Ramayana: ना सोनं, ना चांदी, ना लोखंड... रणबीर कपूरच्या राम कवचासाठी वापरली ही अनोखी गोष्ट; बनवायला लागली साडेतीन वर्षे
ramayan
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 11, 2026 | 12:50 PM

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटातील त्याचा श्रीरामाच्या भूमिकेतील लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील भव्य सेट, वेशभूषा आणि दृश्यांबरोबरच रणबीरने परिधान केलेले कवचही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे कवचं पाहिल्यानंतर ते सोनं, चांदी किंवा लोखंडापासून बनवलं असावं असं सुरूवातीला वाटतं. पण प्रत्यक्षात हे कवचं तयार करण्यासाठी अशा काही वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

या कवचाच्या निर्मितीमागे आसाममधील बरपेटा जिल्ह्यातील जणिया बांगलीपारा या गावातील कारागिरांची मेहनत आहे. जयनेल अब्दिन या कुशल कारागिरांच्या नेतृत्वाखाली 15 जणांनी मिळून हे काम केलं आहे. या लोकांनी तब्बल साडे तीन वर्षांच्या कालावधीत जवळपास 30 ते 35 कवच तयार केले. विशेष म्हणजे हे काम चित्रपटांच्या निर्मात्यांकडून थेट जयनेल यांच्याकडे आलं नव्हतं.

Loading...

कवच तयार करण्याचं काम मात्र अजिबात सोपं नव्हतं. सुरूवातीला कारागिरांनी केवळ वेताचा वापर करून कवचं बनवलं. पण ते खूप कडक आणि घट्ट होतं. कलाकारांना ते परिधान करून सहज हालचाल करणं कठीण जात होतं. त्यामुळे त्यात बदल केले गेले. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने काळ्या आणि हिरव्या रंगाचं रबप उपलब्ध करून दिलं. मात्र केवळ रबरापासून विणकां करणंही शक्य होत नव्हतं.

अशावेळी जयनेल अब्दिन यांनी वेत आणि रबर या दोन्हींचा एकत्र वापर करण्याची कल्पना मांडली. पोशाख डिझायनर अजय यांनी ही कल्पना मान्य केली आणि त्यानुसार नमुना तयार करण्यास सांगितलं. सुरूवातीला कारागिरांना आपण रामायणासाठी हे काम करत आहोत. याची कल्पनाच नव्हती, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपलं काम रामायणाचं भागं असल्याचं कारागिरांना समजलं. जयनेल अब्दिन यांनी या कामामुळे आपल्या टीमचा, गावचा आणि संपूर्ण बरपेटा जिल्ह्याचा अभिमान वाढल्याची भावना व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us