AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर, गलवान संघर्षाची थरारक कहाणी

Maatrubhumi Trailer: येत्या 4 डिसेंबर 2026 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता सलमानचा हा युद्धपट बॉक्स ऑफिसवर किती कमाल करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या 'मातृभूमी'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर, गलवान संघर्षाची थरारक कहाणी
मातृभूमी ट्रेलर, सलमान खानImage Credit source: Youtube
| Updated on: Nov 11, 2026 | 12:46 PM
Share

Maatrubhumi Trailer: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. सलमानच्या आगामी ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये देशभक्ती, सैनिकांचं शौर्य, सीमेवरील तणाव आणि युद्धामुळे दोन्ही देशांतील सैनिकांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रेलरच्या शेवटी सलमान खानने चिनी सैनिकाला उद्देशून म्हटलेला ‘लेट्स सॉर्ट दिस शिट ब्रो..’ हा डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सीमेवर सलमानचा अ‍ॅक्शन अवतार

ट्रेलरची सुरुवात पूर्व लडाखमधील बर्फाच्छादित परिसरातून होते. सलमान खान भारतीय लष्कराच्या 16 बिहार रेजिमेंटमधील अधिकारी म्हणून दिसतो. सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो आपल्या जवानांसह परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे सरसावतो. सुरुवातीला चर्चेच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, चिनी सैनिकांकडून माघार घेण्याची मागणी झाल्यानंतर परिस्थिती चिघळते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी पाहायला मिळते.

पहा ट्रेलर-

‘एक बिहारी, सौ पे भारी’ हा सलमानचा डायलॉगही लक्षवेधी ठरतो. विशेष म्हणजे चित्रपटात केवळ युद्ध आणि मारधाडीवर भर न देता सैनिकांच्या धैर्याबरोबरच युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांनाही महत्त्व देण्यात आलं आहे. ‘शौर्य म्हणजे नेहमी लढणं नाही, तर कधीकधी लढाई थांबवणंही असतं,’ असा आशय ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

चित्रांगदा सिंहसोबत जोडी

या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंह सलमानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सीमेवर जाण्यापूर्वी कुटुंबासोबतचे त्याचे भावनिक क्षण ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. आपल्या मुलाचा निरोप घेताना सलमानचा संवादही मनाला भिडणारा आहे. ‘सैनिक निरोप देत नाहीत, ते सॅल्यूट करतात,’ असं तो मुलाला सांगतो. तर चित्रांगदा त्याला घरी परतताना केवळ आठवणी घेऊन येण्याची विनंती करते. युद्धाचा परिणाम केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकांवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांवरही होतो, हे या दृश्यांतून अधोरेखित करण्यात आलं आहे.

‘अँटी चायना’ चित्रपट नसल्याचं सलमानचं स्पष्टीकरण

या चित्रपटाच्या विषयावरून यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. चित्रपट आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने जाहीर करण्यात आला होता. मात्र, नंतर त्याचं नाव बदलून ‘मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस’ करण्यात आलं. चित्रपट चीनविरोधी असल्याच्या चर्चांवर सलमानने स्पष्टीकरण दिलं होतं. हा कोणत्याही व्यक्तीचा बायोपिक नसून दोन्ही देशांतील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची कथा असल्याचं त्याने सांगितलं. सरकारच्या दबावामुळे स्क्रिप्टमध्ये बदल केल्याच्या चर्चाही त्याने फेटाळल्या होत्या.

अपूर्व लाखिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली असून सलमा खान निर्मात्या आहेत. सलमान आणि चित्रांगदा यांच्यासोबतच चित्रपटात अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Follow Us
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!