सावरकर हिंमतबाज… माफीवीर नव्हते; रणदीप हुड्डा याचं रोखठोक मत

| Updated on: Mar 04, 2024 | 5:33 PM

रणदीप हुड्डा हे कायमच चर्चेत असतात. रणदीप हुड्डा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणदीप हुड्डा यांनी नुकताच मोठे विधान केले. आता रणदीप हुड्डा यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. रणदीप हुड्डा यांनी हे विधान सावरकरांबद्दल केले आहे.

सावरकर हिंमतबाज... माफीवीर नव्हते; रणदीप हुड्डा याचं रोखठोक मत
Follow us on

मुंबई : रणदीप हुड्डा हे कायमच त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. रणदीप हुड्डाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. फक्त हेच नाही तर रणदीप हुड्डा यांचे चित्रपट धमाका करताना दिसतात. दरवेळी काहीतरी वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येताना रणदीप हुड्डा दिसतात. यावेळी रणदीप हुड्डा हे विनायक दामोदर सावरकर यांच्यावर चित्रपट घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच तूफान चर्चेत आलाय. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाची मोठी क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये बघायला मिळतंय.

नुकताच आता स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. यावेळी बोलताना रणदीप हुड्डा यांनी बरेच मोठे दावे केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी रणदीप हुड्डा हे थेट सावरकर यांच्या माफीच्या वादावर आपले मत व्यक्त करताना दिसले. रणदीप हुड्डा यांनी थेट म्हटले की, सावरकर हे कधीच माफी मागणारे नव्हते.

माफी वादावर रणदीप हुड्डा म्हणाले की, आजच्या काळात सावरकरांबद्दल ऐकल्यावर तुमच्या मनात पहिला शब्द काय येतो? माफीवीर? ते कधीच माफीवर नव्हते…त्यांनी त्यावेळी फक्त जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी देखील प्रत्येक व्यक्तीला न्यायालयात याचिका करण्याचा अधिकार होता आणि सावरकरांनी देखील तेच केले.

पुढे रणदीप हुड्डा म्हणाले की, काळ्या पाण्याची तुम्हाला शिक्षणा 15 वर्षांसाठी असेल तर तुम्ही 24 तास तुरुंगाच्या खोलीत आराम तर करणार नाहीत ना? पुढची 15 वर्षे त्या खोलीमध्ये रिसॉर्ट बनून राहणार तर नाही ना. रणदीप हुड्डा म्हणाले की, कोर्टात याचिका दाखल झाल्यावर भाषा कशी असते, हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल.

हुड्डा पुढे म्हणाले, तुम्ही तिथून बाहेर पडण्यासाठी काहीही कराल. मग ती कोणती शिक्षा असो किंवा किंमत असो. हेच नाही तर यावेळी एक डायलॉग मारताना रणदीप हुड्डा म्हणाले, “दुश्मन को किए वादे, निभाए नहीं जाते.” रणदीप हुड्डा म्हणाले, सावरकर हे खूप जास्त हिंमतबाज होते ते कधीच भित्रे नव्हते. रिलीज होण्याच्या अगोदरच आता हा चित्रपट चर्चेत आलाय.