अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न आणि पूजा केली असती… राणी मुखर्जीचं मोठं वक्तव्य

Rani Mukerji on Amitabh Bachchan: राणी मुखर्जीने व्यक्त केली होती अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त... काय म्हणाली होती राणी मुखर्जी? राणी कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत...

अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न आणि पूजा केली असती... राणी मुखर्जीचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jun 24, 2025 | 2:41 PM

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. रणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना निर्माता आदित्य चोप्रा याच्यासोबत लग्न केलं. राणीला एक मुलगी देखील आहे. आदित्य याच्यासोबत लग्न करण्याआधी राणीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. एवढंच नाही तर, राणीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. राणी हिच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, राणीने मुलाखतींमध्ये जास्त काही बोलत नाही. पण अभिनेत्री तिच्या मनातील गोष्ट सर्वांसमोर स्पष्टपणे ठेवते.

एका मुलाखतीत राणी म्हणाली होती, संधी मिळाली असती तर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न केलं असतं. याचं कारण देखील राणीने मुलाखतीत सांगितलं होतं. राणी मुखर्जी हिला बिग बींसोबत लग्न करायचं होचं, जे तिच्यापेक्षा 35 वर्षांनी मोठे होते. मुलाखतीत राणीला होणारा नवरा कसा असायला हवा, तुझ्या अपेक्षा काय आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर राणी हिने अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं. शिवाय त्यांची पूजा करायला देखील मला आवडेल. अखेर 2005 मध्ये राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॅक’ सिनेमात एकत्र काम केलं. सिनेमात दोघांनी किसिंग सीन देखील दिला होता. ज्याची नंतर तुफान चर्चा झाली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांनी देखील राणीचं कौतुक केलं होतं. ज्याची देखील तुफान चर्चा रंगली.

राणी मुखर्जी हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केलं. ‘बंटी ओर बबली’, ‘कभी अलवीदा ना कहना’ यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी काम केलं. मोठ्या पडद्यावरील दोघांच्या जोडीला चाहत्यांना डोक्यावर घेतलं. एवढंच नाही तर, खासगी आयुष्यात देखील राणी आणि अभिषेक यांनी एकमेकांना डेट केलं आहे. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. आराध्या आणि ऐश्वर्या यांना कायम एकत्र स्पॉट करण्यात येतं. बच्चन कुटुंबिय कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतं.