‘धुरंधर 2’ ने रचला इतिहास, 3 दिवसांमध्ये कमाई 400 कोटी पार, जवान आणि KGF 2 ला टाकले मागे

राज्यात सध्या धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कमाई करून इतिहास रचला आहे. या चित्रपटाने शाहरुखच्या जवान आणि KGF2 चित्रपटाला मागे टाकलं आहे.

धुरंधर 2 ने रचला इतिहास, 3 दिवसांमध्ये कमाई 400 कोटी पार, जवान आणि KGF 2 ला टाकले मागे
| Updated on: Mar 22, 2026 | 7:18 AM

Ranveer Singh Dhurandhar 2 Box Office collection : दिग्दर्शक आदित्य धर यांचा स्पाय-ॲक्शन चित्रपट धुरंधर: द रिवेंज सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटगृहांपासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत असून प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाने रिलीजपूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई करत आपली ताकद दाखवली होती. त्यानंतर आता रिलीज झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत जुन्या रेकॉर्डना मागे टाकण्याची कामगिरी सुरू ठेवली आहे.

‘धुरंधर 2’च्या कमाईत शनिवारी मोठी वाढ

‘धुरंधर 2’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपटाने सुमारे 77 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या वेगवान कमाईच्या पार्श्वभूमीवर अंतिम आकडेवारी 100 कोटी रुपयांचा आकडा सहज पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

चित्रपटातील दमदार अ‍ॅक्शन सीक्वेन्स, थरारक कथानक आणि रणवीर सिंहची ऊर्जा यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाची कमाई अशाच वेगाने वाढत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या अंतिम कमाईचे अधिकृत आकडे अद्याप समोर आले नसले तरी या चित्रपटाची क्रेझ पाहता हा चित्रपट मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे.

प्रीमियरमधून मोठी कमाई

19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ ने पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई केली आणि जगभरात या चित्रपटाच्या कमाईची चर्चा झाली. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी चित्रपटाने 113.02 कोटींची कमाई केली. ज्यामुळे भारतातील त्याची एकूण कमाई 339.29 कोटींवर पोहोचली आणि एकूण कलेक्शन 404.56 कोटी झाले. यापूर्वी चित्रपटाने प्रीमियरमधून 43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज देखील या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. रविवार असल्यामुळे थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते गर्दी करत असताना दिसत आहेत.

Follow Us