Ranveer Singh: रणवीर सिंगच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन, अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंग याच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ज्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे.

‘धुरंधर’ फेम अभिनेता रणवीर सिंग याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण कुटुंबील महत्त्वाच्या व्यक्तीने वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रणवीर याचे आजोबा डॉ. राम हिंगोरानी यांचं 8 नोव्हेंबर रोजी म्हणजे दिवळीच्या दिवशीच निधन झालं आहे. आजोबांच्या निधनानंतर त्यांची नात सौम्या हिंगोरानी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. पण रणवीर याने आजोबांच्या निधनावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेला नाही. यादरम्यान, रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या आजोबांसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
या व्हिडिओवरून असं दिसून येते की तो आपल्या ‘रॉकस्टार’ आजोबांवर खूप प्रेम करत होता. दुसरीकडे, मंगळवारी रात्री सौम्या यांनी आजोबांच्या निधनाची माहिती दिली. तिने त्यांच्यासोबत असलेले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, ज्यासोबत तिने एक इमोशनल नोटही लिहिली आहे. तिने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि त्यांनी मागे सोडलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आजोबांसाठी नातीची भावूक पोस्ट
सौम्या हिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे, ’96 वर्षांचे आयुष्य. हे एक शानदार आयुष्य आहे, ज्यावर शोक करण्याऐवजी उत्सव साजरा केला पाहिजे. माझे आजोबा डॉ. राम हे दिवाळीच्या दिवशी शांतपणे आम्हाला सोडून माझ्या आजीकडे निघून गेले. जाण्यासाठी त्यांनी याहून अधिक चांगला आणि शुभ काळ निवडला नसता. लक्ष्मीपूजन सुरू असतानाचा दिवसाचा तो सर्वात सोनेरी क्षण होता. मला खात्री आहे की ते दोघेही आपापल्या खुर्चीवर बसले असतील, व्हिस्कीची चुस्की घेत असतील आणि आम्हाला एकत्र पाहून आनंद होत असतील. जगातील सर्वात उत्तम आजोबा असल्याबद्दल तुमचे आभार. आम्हाला सर्वकाही दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी आईस्क्रीमचा एक स्कूप राखून ठेवा, जोपर्यंत आपण पुन्हा एकत्र नाचत नाही. हरी ओम.’ सध्या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, रणवीर कायम आजोबांसाठी असलेलं प्रेम व्यक्त करायचा… अनेकदा तर त्याने आजोबांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ज्यामुळे रणवीर याचं आजोबांसोबत किती भावूक नातं आहे, हे समोर आलं. 2023 मध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने एक व्हिडीओ पोस्ट केलेला, ज्यामध्ये रणवीर ‘क्या झुमका’ गाण्यावर आजोबांसोबत डान्स करताना दिसला.
एवढंच नाही तर, रणवीर सिंगने आजोबांसोबतचे काही फोटोही शेअर केलेलं, ज्यामध्ये आजोबांनी ‘टीम रॉकी असं लिहिलेला टी-शर्ट घातलेला दिसत आहे. वयाच्या 93 व्या वर्षीही ते पूर्णपणे उत्साहाने भरलेले होते आणि त्यांनी एक मजेशीर मागणीही केलेली, व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “टिक्की सोडा, माझ्यासाठी थोडी टकीला घेऊन या!” हे फोटो शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिलेलं, “आजोबा अगदी अस्सल ‘रॉकी’ स्टाईलमध्ये आहेत, 93 व्या वर्षीही एकदम जबरदस्त!” सध्या अभिनेत्याची जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.