जया बच्चन यांचा भन्नाट व्हिडीओ; कधीच पाहिला नसेल असा हटके अंदाज, नेटकरीही हवाक्!

अभिनेता रणवीर सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री जया बच्चन दिसत आहेत. त्यांचा मजेशीर अंदाज पाहून नेटकरीसुद्धा चकीत झाले आहेत.

जया बच्चन यांचा भन्नाट व्हिडीओ; कधीच पाहिला नसेल असा हटके अंदाज, नेटकरीही हवाक्!
Jaya Bachchan and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2024 | 4:41 PM

अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला वर्ष पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शिन क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. रणवीर आणि आलियाची जोडीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रणवीरने सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनसुद्धा दिसत आहेत. विशेष म्हणजे नेहमीच तापट स्वभावात दिसणाऱ्या जया बच्चन यांचा एक वेगळाच अंदाज या व्हिडीओत पहायला मिळत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात जया बच्चन यांनी रणवीरच्या आजीची भूमिका साकारली होती. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या रणवीरसोबत जीभ काढून त्याला चिढवताना दिसत आहेत. तर त्यांचा असा मजेशीर अंदाज पाहून रणवीरच्या चेहऱ्यावरही चकित झाल्याचे हावभाव आहेत. जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर कमेंट करताना काही नेटकऱ्यांनी जया बच्चन यांचं सून ऐश्वर्या रायसोबत असलेल्या नात्यावरून फिरकी घेतली. ‘जेव्हा त्या ऐश्वर्याला बघतात, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशीच असेल’, असं एकाने लिहिलंय. तर ‘माफ करा, पण मला त्या खूप अहंकारी वाटतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘जया बच्चन मस्करी पण करतात का? नेहमी तर त्या चिडलेल्या दिसतात’, अशीही उपरोधिक कमेंट एकाने केली आहे.

पहा व्हिडीओ

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं. यामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्टसोबतच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि अंजली आनंद यांसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात तब्बल 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

रणवीरने या चित्रपटात रॉकी रंधावाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याने 25 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारलं होतं. तर आलिया यामध्ये रानी चॅटर्जीच्या भूमिकेत होती. आलियाने 10 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी रॉकीच्या आजोबांची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांना दीड कोटी रुपये मानधन मिळालं होतं. तर जया बच्चन या रॉकीच्या आजीच्या भूमिकेत होत्या. त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं होतं.