गाणे शूट करताना चक्क दोन तास बेशुद्ध होती अभिनेत्री, 32 वर्षांनंतरही गाणं ट्रेंडमध्ये गाणं

बॉलिवूडमधील एक गाणे असे आहे जे 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. हे गाणे शूट करत असताना अभिनेत्री अचानक बेशुद्ध झाली होती. जवळपास दोन तास अभिनेत्री शुद्धीत नव्हती. आता नेमकं काय झालं? वाचा...

| Updated on: Oct 31, 2026 | 1:52 PM
1 / 5
बॉलिवूडमधील गाणी हे जगभरात लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते. इतर देशातील लोकांना त्या गाणाचा अर्थ समजत नसला तरीही त्याचे म्यूझिक प्रचंड आवडते. त्यामुळे गाण्याची क्रेझ ही प्रचंड आहे. बॉलिवूडमधील एक असेच 32 वर्षांपूर्वीचे गाणे आहे जे आजही ट्रेंडमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे शूट करताना अभिनेत्री बेशुद्ध झाली होती. आता हे गाणे कोणते आहे? चला जाणून घेऊया...

2 / 5

आम्ही रविना टंडनच्या मोहरा या चित्रपटाविषयी बोलत आहोत. या चिपटात अक्षय कुमार, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा तो चित्रपट होता जेव्हा रवीना आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर होती.

3 / 5

या चित्रपटात एकाहून एक गाणी होती. पण खास गोष्ट ही की, या चित्रपटाच्या लोकप्रिय गाण्याचे शूटिंग करताना रवीना टंडन इतकी व्यस्त होती की थकव्यामुळे बेशुद्ध झाली होती आणि त्यामुळे शूटिंग पुढे ढकलावे लागले होते.

4 / 5

रवीना टंडनच्या ‘मोहरा’ चित्रपटाच्या ज्या गाण्याबद्दल आम्ही बोलत आहोत ते आहे ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त.’ हे गाणे कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी गायले होते. याचे बोल आनंद बक्षी यांनी लिहिले होते. IMDb नुसार, रवीना टंडन एकाच वेळी दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि “तू चीज बड़ी है मस्त मस्त” गाण्याच्या शूटिंगदरम्यान ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर शूटिंग दोन तासांसाठी थांबवावे लागले होते.

5 / 5

‘मोहरा’ चित्रपटात ८ गाणी होती, ज्याचे बोल इंदीवर आणि आनंद बक्षी यांनी लिहिले होते. तर विजू शाह यांनी संगीत दिले होते. यात ‘ना कजरे की धार’, ‘सुबह से लेकर’, ‘काश कहीं ऐसा होता’, ‘दिल हर कोई’, ‘टिप टिप बरसा पानी’, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’, ‘ना कजरे की तस्वीर तेरी’, ‘ना कजरे की कोई और नहीं’ यांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us