स्टूडिओमध्ये लादी पुसायची ही अभिनेत्री, पहिल्याच सिनेमासाठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार! आज सुपरस्टार
90च्या दशकातील एक अशी अभिनेत्री आहे जिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्याआधी स्टूडिओमध्ये लादी पुसण्याचे काम केले होत. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया...

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपली जागा मिळवणे सोपे नसते. इथे आपली जागा निर्माण करण्यासाठी किंवा एक संधी मिळवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. ९० च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री आहे, जिने करिअरच्या सुरुवातीला स्टुडिओमध्ये फरशी साफ करण्याच केली. पण आज ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. आपल्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चला जाणून घेऊया ती अभिनेत्री कोण आहे?
९० च्या दशकातील ज्या अभिनेत्रीची आपण चर्चा करत आहोत, ती दुसरी कोणी नसून रवीना टंडन आहेत. आपल्या करिअरमध्ये रवीना यांनी अनेक मोठ्या सुपरस्टारसोबत काम केले आहे. रवीना टंडन ५४ वर्षांच्या आहेत. ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये आलेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट हिट ठरला होता. रवीना यांनी एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलले होते.
रवीना टंडन यांनी २०२२ मध्ये ‘मिड-डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यावसायिक आयुष्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांनी जाहिरात चित्रपट निर्माते प्रहलाद कक्कड यांची असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत इंटर्नशिप करताना त्यांना वाटले की त्या मॉडेलिंग करू शकतात आणि थोडेफार पैसे कमवू शकतात. रवीना म्हणाल्या, “मी स्टुडिओची फरशी स्वच्छ करण्यापासून ते फरशीवरील उलटी स्वच्छ करण्यापर्यंतचे काम केले आहे. दहावी पास झाल्यानंतर लगेचच मी प्रह्लाद कक्कड यांना असिस्ट करायला सुरुवात केली होती.”
मोफत मॉडेलिंग करण्याऐवजी पैसे मागणे
रवीना पुढे म्हणाल्या, “जेव्हा प्रह्लाद यांच्या सेटवर कोणतीही मॉडेल येत नसे, तेव्हा ते म्हणायचे ‘रवीनाला बोलावा’ आणि मला मेकअप करून पोझ द्यायला सांगायचे. तेव्हा मी विचार केला की, हे काम करायचेच असेल तर प्रहलाद यांच्यासाठी वारंवार मोफत करण्याऐवजी यातून थोडेफार पैसे का कमवू नये? याच विचाराने माझ्या मॉडेलिंगची सुरुवात झाली. त्यामुळे मी खरे तर या इंडस्ट्रीत संयोगाने आले. मी कधीच मोठी होऊन अभिनेत्री व्हायचे स्वप्न पाहिले नव्हते.”
२०२३ मध्ये एएनआयच्या पॉडकास्टवर बोलताना रवीना यांनी सांगितले की, मॉडेलिंगच्या दिवसांत त्यांना सातत्याने चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण अभिनयात त्यांना विशेष रस नव्हता. तसेच त्यांनी अनेक चित्रपट नाकारल्याबद्दलही सांगितले होते. यामध्ये मोठ्या तारकांच्या चित्रपटांचाही समावेश होता. त्यांनी सांगितले की, यश चोपडा यांच्या ‘डर’ चित्रपटासाठी त्या पहिली पसंती होत्या, ज्यात नंतर शाहरुख खान, सनी देओल आणि जूही चावला यांनी काम केले. मात्र त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला, कारण काही सीन त्यांना करायचे नव्हते. त्या म्हणाल्या, “‘डर’ सर्वात आधी माझ्याकडे आला होता. चित्रपट अश्लील नव्हता, पण त्यात काही असे सीन होते ज्याबाबत मला समस्या होती. जसे की स्विमिंग कॉस्ट्यूम परिधान करणे, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले ‘नाही, मी हे परिधान करणार नाही’.”