Tere Ishk Mein X Review: कसा आहे धनुष आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरे इश्क में’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Tere Ishk Mein X Review: दाक्षिणात्य स्टार धनुषचा 'तेरे इश्क में' चित्रपट आज शुक्रवारी सिनेमागृहांत रिलीज झाला आहे. या चित्रपटात धनुषसोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसत आहे. दोघांची एकत्रित हा पहिला चित्रपट आहे. रिलीज होताच चित्रपटाने सिनेमागृहांत धुमाकूळ घातला आहे. तसेच नेटकऱ्यांनी चित्रपटा रिव्ह्यू देखील दिला आहे. वाचा...

Tere Ishk Mein X Review: कसा आहे धनुष आणि क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में सिनेमा? वाचा रिव्ह्यू
Tere Ishq Mai
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 28, 2025 | 1:59 PM

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि साऊथ स्टार धनुष हे पहिल्यांदाच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. हा चित्रपट 28 नोव्हेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाचा रिव्ह्यू..

‘तेरे इश्क में’ हा 2025 या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही चित्रपटाचा रिव्ह्यू येऊ लागला आहे. सर्वांनी ‘तेरे इश्क में’ची प्रशंसा केली आहे. धनुष आणि क्रिती सेनॉन यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून धनुषने बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रॉय यांनी केले आहे. चला जाणून घेऊ की ‘तेरे इश्क में’ बद्दल लोकांनी सोशल मीडियावर काय लिहिले आहे.

धनुष आणि क्रिती सेनॉन यांचा जबरदस्त अभिनय

धनुष आणि क्रिती सेनॉन यांच्या चित्रपटाचा रिव्ह्यू देत एका यूजरने लिहिले की, ‘धनुष आणि क्रिती सेनॉन यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. जबरदस्त रोमँटिक कथा आहे. पैसे वसूल चित्रपट आहे’. दुसऱ्याने एका प्रेक्षकाने लिहिले की, ‘काय डायलॉग आहेत, काय केमिस्ट्री आहे. धनुष आणि क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में रिलीज झाला आहे. तुम्ही जवळच्या सिनेमागृहात जाऊन पाहू शकता.’ तिसऱ्या एका यूजरने लिहिले ती, ‘थलायवा धनुष. तेरे इश्क में अजिबात चुकवू नका.’

2025 वर्षातील सर्वोत्तम चित्रपट

तेरे इश्क में सिनेमा पाहिल्यानंतर एका प्रेक्षकांने लिहिले की, ‘लक्षात ठेवा तेरे इश्क में 2025 चा सर्वोत्तम चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा.’ तर दुसऱ्या एका यूजरने म्हटले की हा चित्रपट रडवेल. त्याने पुढे लिहिले की ‘थलायवा तेरे इश्क में अजिबात पाहायला विसरु नका. हा चित्रपट हसवेल, तुमचा त्याच्यावर जीव दडेल आणि तो तुम्हाला रडवेलही. प्योर सोल मूवी.’

हिंदी आणि तमिळमध्ये रिलीज झाला चित्रपट

आनंद एल राय दिग्दर्शनात बनलेला ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी प्रोड्यूस केला आहे. तो हिंदीसोबतच तमिळ भाषेतही रिलीज झाला आहे कारण धनुष हा तमिळ चित्रपटसृष्टीचा स्टार आहे. रिपोर्टनुसार, रिलीजपूर्वीच ‘तेरे इश्क में’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 5.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. ट्रेड तज्ज्ञांच्या मते, धनुष आणि क्रिती सेनॉनचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी डबल डिजिटमध्ये व्यवसाय करेल.