
Rekha and Amitabh Bachchan: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आज कोणाला माहिती नसेल असं कोणीच नाही… एक काळ असा होता जेव्हा फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, खऱ्या आयुष्यात देखील रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. अनेक वर्षांपूर्वी रेखा आणि बिग बी यांचे मार्ग वेगळे झाले. पण रेखा आजही सर्वांसमोर मनातील भावना व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, एका मुलाखतीत देखील रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला होता. जेव्हा रेखा यांनी सर्वांसमोर बिग बींना मिठी मारली.
किस्सा आहे ‘सिलसिला’ सिनेमा दरम्यानचा…. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. सिनेमात अमिताभ बच्चन यांनी रेखा यांची फार मदत केली. रेखा यांनी सांगितल्यानुसार ‘सिलसिला सिनेमात एक गंभीर सीन होता. जो जवळपास 15 हजार लोकांसमोर करायचा होता.’ ज्यामध्ये रेखा यांचे अनेक डायलॉग आणि भावनिक क्षण देखील होते.
डायलॉग मोठे आणि जास्त असल्यामुळे रेखा यांनी यश चोप्रा यांच्याकडे तयारीसाठी अधिकचा वेळ मागितला. पण यश चोप्रा यांनी स्पष्टपणे नकार दिला. अशात अमिताभ बच्चन यांनी रेखा यांची समज काढली. बिग बी म्हणाले, ‘जायंट’ सिनेमात जेम्स डीन यांची देखील अशीच अवस्था झाली होता. अशा परिस्थितीत झालं काय त्यांनी पाठ फिरवली आणि सर्वांसमोर लघवी केली… तेव्हा जेम्स डीन म्हणाले याच्यापेक्षा आणखी वाईट काय असू शकतं? आणि अमिताभ बच्चन यांनी समज घातल्यानंतर रेखा यांनी सीन उत्तम प्रकारे पार पाडला.
रेखा म्हणाल्या, ‘माझ्या मनावर दडपण होतं. कॅमेरा सुरु झाल्यानंतर प्रत्येक जण शांत झाले आणि सीन दमदार झाला. सीन संपल्यानंतर मी धावत आली आणि अमित जी यांना मिठी मारली… तेव्हा ooohhh अशी सर्वांची प्रतिक्रिया होती. तेव्हा माझं माझ्या भावनांवर नियंत्रण नव्हतं…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा आज बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक शोमध्ये रेखा हजेरी लावतात आणि पूर्वी बॉलिवूड कसं होतं… याबद्दल अनेक गोष्टी सांगतात. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलच कायम चर्चा रंगलेली असते. अनेक सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली पण त्यांना वैवाहिक आयुष्याचं सुख अनुभवता आलं नाही. आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आहेत.