करीना कपूर झाली भावूक, कारमध्ये गुपचूप पुसले अश्रू? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Kareena Kapoor Khan: करामध्ये बसलेली करीना कपूर झाली भावूक? 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त..., करीना कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल...

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत करीना हिने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 90 च्या दशकात चाहत्यांमध्ये असलेलं करीनाचं क्रेझ आजही कमी झालेलं नाही. करीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्रीबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करीना कपूर डोळे पुसताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली. व्हिडीओमध्ये करीना भावूक झाल्याचं देखील दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, करीनाचा व्हिडीओ अभिनेत्री सोनम कपूर हिच्या वाढदिवसाच्या पार्टीचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये करीना तिच्या कारमध्ये बसलेली दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहते म्हणाले की, ‘करीना स्मार्टली स्वतःचे अश्रू लपवत आहे…’ सध्या सर्वत्र करीनाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. करीनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
सांगायचं झालं तर, करीना तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक मुलाखतींमध्ये करीना तिच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय फिटनेसबद्दल देखील अभिनेत्री कायम चाहत्यांना टिप्स देत असते. एवढंच नाही तर, वयाच्या 44 वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
View this post on Instagram
करीना कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील करीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सांगायचं झालं तर, पूर्वी करीना मुले तैमूर आणि जेह यांच्यासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. पण आता अभिनेत्री मुलांसोबत फोटो पोस्ट करत नाही. जानेवारी महिन्यात झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान आणि करीना यांनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली आहे.
