
Riteish Deshmukh – Genelia Dsouza : बॉलिवूडचे पॉव्हर कपल अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तब्बल 9 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी लग्न केलं. 3 फेब्रुवारी 2012 मध्ये कुटुंबिय आणि दिग्गजांच्या उपस्थितीत रितेश आणि जिनिलाया यांनी लग्न केलं. दोघांच्या नात्यामध्ये एक वेळ अशी देखील आली होती, जेव्हा रितेश याच्या एक वक्तव्याने जिनिलिया हिला फार मोठा धक्का बसला होता. सांगायचं झालं तर, रितेश कायम विनोद करत असतो… पण अभिनेत्याच्या विनोदाची सवय जिनिलिया हिला महागात पडली होती. विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमध्ये मोठा खुलासा केलेला.
रितेश याने सांगितल्यानुसार, त्याने जिनिलिया समोर ब्रेकअपचं नाटकं केलं होतं. अभिनेत्याने जिनिलिया हिला एक मेसेज लिहिला होता, ज्यामुळे जिनिलिया हिला फार मोठा धक्का बसला होता. ‘आपण आता एकत्र राहू शकत नाही…’ असा मेसेज अभिनेत्याने केलेला. रितेश याचा मेसेज पाहून जिनिलिया हिला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर रितेश याने ठरवलं की, जिनिलिया हिच्यासोबत कधीच असा विनोद करणार नाही. त्यानंतर, जिनिलिया हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं, रितेश याने ब्रेकअपचा मेसेज केला आणि झोपून गेला..
पुढे जिनिलिया म्हणालेली, ‘मी लवकर झोपायची आणि रितेश उशिरा झोपायचा… मी रात्री त्याचा मेसेज वाचला आणि पूर्णपणे पागल झालेली आणि सकाळी उठल्यानंतर रितेशला त्याने केलेला मेसेज देखील आठवत नव्हता…’ दोमध्ये भांडण झाल्यानंतर, रितेश याने जिनिलिया हिची माफी मागितली आणि एप्रिल फूलचा मेसेज होता असं सांगितलं…
रितेश आणि जिनिलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. 2002 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरु केली. एका सिनेमात दोघांना लग्नाचा सीन करावा लागलेला. पण आपलं भविष्यात लग्न होईल… असं दोघांना देखील वाटत नव्हतं, म्हणून सिनेमातच तो आनंद घ्यायला हवा, असा विचार करत आम्ही तो सीन हसण्यावारी नेला आणि पुढे गेलो,” अशी आठवण रितेशने या शोमध्ये सांगितली.
आज रितेश आणि जिनिलिया कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. आता देखील अनेक ठिकाणी रितेश आणि जिनिलिया यांना स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर देखील दोघांने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.