मी त्यांचे चित्रपट पाहत नाही कारण… भर कार्यक्रमात रितेश देशमुखबद्दल लहान भाऊ धीरज देशमुख असं का म्हणाले?
Dhiraj Deshmukh On Ritiesh Deshmukh Movie: रितेश देशमुख यांचे लहान बंधू आमदार धीरज देशमुख हे रितेशचे चित्रपट पाहत नाही यामागचे कारण काय ते जाणून घ्या...

लातूर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान बोलताना आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी एक विधान केले आहे. या विधानाची चर्चा सर्वत्र होत आहे. मोठा भाऊ रितेश देशमुख यांच्यावर त्यांनी विधान केले आहे.
ते म्हणाले की, "रितेश देशमुख माझे भाऊ असले तरी आणि ते चित्रपट बनवत असले तरीही त्यांचेही चित्रपट मला पाहता येत नाही. हे विधान त्यांनी लातूर जिल्हा बँक निवडमुकीदरम्यान केले आहे.
याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तर रितेशचे चित्रपट का पाहता येत नाही यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, "वेळच नाही ओ, काकालाही वेळ नाही, मलाही वेळ नाही."
पुढे ते म्हणाले की, "कधी कोणता चित्रपट आला आणि कधी गेला तो हे कळतच नाही, कामात व्यग्र असल्यामुळे वेळच मिळत नाही चित्रपट पाहायला."
धीरज यांनी यावेळी भाषण देताना अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटाचाही उल्लेख केला आणि या चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्याचं सांगितलं. त्यांनी यावेळी चित्रपटातील अजय देवगणच्या विजय साळगांवकर या पात्राचं कौतुक केलं.