
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 दरम्यान पंजाब किंग्सचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याच्यासोबत कथित गर्लफ्रेंड आरजे महवश दिसली होती. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. महवश पंजाब किंग्सला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक सामन्याला उपस्थित राहायची. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले. धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर चहल आणि महवश अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. या काळात महवश एका वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्यानंतर लोक म्हणू लागले की स्टार फिरकीपटूमुळे तिचे करिअर बनले. यानंतर महवशने एक व्हिडिओ शेअर करून तिच्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
आरजे महवशने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला. त्यात तिने सांगितले की ती 2019 पासून या इंडस्ट्रीत आहे. तिने एका चाहत्यावर उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, जेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी क्रिकेटवर शो करत आहे. त्यानंतर अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये तिच्या कामाची एक झलक दाखवली. तिचे एक प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘सेक्शन 108’सह अनेक चित्रपट बनले आहेत. व्हिडीओमध्ये ती सलमान खानपासून कार्तिक आर्यनपर्यंत अनेक स्टार्सच्या मुलाखती घेताना दिसत आहे. तसेच अनेक शोजमध्ये पुरस्कार स्वीकारतानाही ती दिसत आहे.
वैज्ञानिकाची मुलगी आहे
व्हिडीओमध्ये महवश म्हणते की, काही लोक माझ्या टॅलेंटवर प्रश्न उपस्थित करतात, तर मी सांगते की मी एका वैज्ञानिकाच्या मुली आहे आणि दोन पुस्तके लिहिली आहेत. पुरस्कार मिळवण्यासाठी मेहनत लागते. मी सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या रील्सच्या टॉप 10 मध्ये राहिली आहे. या दरम्यान तिने यजुवेंद्र चहलसोबतच्या तिच्या नात्याबाबतही मोठी गोष्ट सांगितली.
चहलबद्दल मोठे विधान
टीम इंडियाचा खेळाडू यजुवेंद्र चहलबद्दल महवश म्हणाली की, जर माझा कोणी मित्र यशाच्या शिखरावर असेल, तर मी त्याच्याबद्दल ओरडून ओरडून जगाला सांगणार. जर तुमचा मित्र असता तर तुम्हीही तसेच केले असते आणि ज्यांच्यासोबत मी बसते- उठते, त्यांच्याच गोष्टी करणार ना. माझे असेही अनेक मित्र आहेत, ज्यांचे घराचे भाडे मी दिले आहे, मग माझ्या गरीब मित्रांबद्दल तुम्ही का बोलत नाही. मी चित्रपट निर्माती, अभिनेत्री, कंटेंट क्रिएटर, रेडिओ जॉकी, होस्ट सर्व काही केले आहे. माझे करिअर खूप मोठे आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही आणि जर मी बँक बॅलन्स दाखवला तर… यानंतर अभिनेत्री हसत हसत व्हिडीओ संपवते.
या वेब सीरिजमध्ये दिसत आहे
महवशने तिच्या करिअरची नवी सुरुवात केली आहे. तिने प्यार पैसा प्रॉफिट या वेब सीरिजमधून तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आहे, जी दुर्जॉय दत्ताच्या बेस्टसेलिंग कादंबरी नाउ दॅट यू आर रिच लेट्स फॉल इन लव वर आधारित आहे. हा शो अमेझॉन एमएक्स प्लेयरवर पाहता येईल. यात प्रतीक यादव, मिहिर आहूजा, नील भूपलम, नितीश शर्मा, शिवांगी खेडकर आणि आशीष राघव मुख्य भूमिकेत आहेत.