Roadies 19 | पैशांसाठी तिने बनवला स्वत:चाच प्रायव्हेट व्हिडीओ; लीक झाल्यानंतर सोनू सूदने दिलं ॲपवर बंदी आणण्याचं आश्वासन

खासगी व्हिडीओ लीक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश मिळाल्याचंही भूमिकाने सांगितलं. त्यामागे एक मोठा नेटवर्क काम करत असल्याचा खुलासा तिने केला. भूमिकाची ही कहाणी ऐकल्यानंतर रोडिजच्या परीक्षकांनी तिची साथ दिली.

Roadies 19 | पैशांसाठी तिने बनवला स्वत:चाच प्रायव्हेट व्हिडीओ; लीक झाल्यानंतर सोनू सूदने दिलं ॲपवर बंदी आणण्याचं आश्वासन
भूमिका वशिष्ठ
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 06, 2023 | 7:01 PM

मुंबई : स्प्लिट्सविला फेम स्पर्धक भूमिका वशिष्ठ लवकरच रोडिज 19 या प्रसिद्ध शोमध्ये भाग घेणार आहे. स्प्लिट्सविला हा शो संपल्यानंतर ती तिच्या खासगी व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. भूमिकाचा प्रायव्हेट व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला होता. त्यानंतर तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. आता रोडिजमध्ये तिने या व्हायरल स्ट्रिपिंग व्हिडीओबद्दल मोठा खुलासा केला आहे. भूमिका नुकतीच रोडिजच्या ऑडिशन्समध्ये झळकली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला.

भूमिका वशिष्ठला गँग लीडर्सने विचारलं की तिला या शोमध्ये का भाग घ्यायचा आहे? त्यावर ती म्हणाली, “मी एका रुढीवादी कुटुंबातून आहे. शोबिज इंडस्ट्रीवर माझ्या कुटुंबीयांचा फारसा विश्वास नाही. मात्र त्यांच्या विरोधात जाऊन मी या इंडस्ट्रीत आले. स्प्लिट्सविलामधील माझा प्रवास खूप सुंदर होता. मात्र त्या शोनंतर मी माझ्या आयुष्याचा सर्वांत वाईट काळ पाहिला. मी जणू एका अशा अंधाऱ्या खड्ड्यात पडले होते, जिथून बाहेर निघण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.”

भूमिकाने पुढे सांगितलं, “मी काही व्हिडीओ शूट केले होते. जाणूनबुजून नाही पण त्यात मी एका मुलीला किस करताना, स्ट्रिपिंग करताना दिसतेय. प्रसिद्ध होण्यासाठी आणि पैशांसाठी मी तो व्हिडीओ शूट केला होता. स्प्लिट्सविलानंतर मी कर्ज घेतलं होतं. मला प्रसिद्धी आणि पैशांशी फार प्रेम होतं. मात्र काही पैशांसाठी मी तो व्हिडीओ शूट केल्याचा मला पश्चात्ताप आहे. ते व्हिडीओ प्रायव्हेट असतील असं मला सांगितलं गेलं होतं. त्याबदल्यात मला पैसे मिळाले. पण नंतर ते सगळीकडे लीक करण्यात आले. त्या व्हिडीओमुळे माझ्या कुटुंबीयांसोबतही नातं तुटलं. मी स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसले होते. या इंडस्ट्रीत माझं मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं, म्हणून मी भरकटत गेले. मी फक्त पैशांच्या मागे धावत गेले. या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी मी खूप संघर्ष केला. मला रिया चक्रवर्ती मॅमसारखं पुनरागमन करायचं आहे.”

खासगी व्हिडीओ लीक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश मिळाल्याचंही भूमिकाने सांगितलं. त्यामागे एक मोठा नेटवर्क काम करत असल्याचा खुलासा तिने केला. भूमिकाची ही कहाणी ऐकल्यानंतर रोडिजच्या परीक्षकांनी तिची साथ दिली. अभिनेता सोनू सूदने भूमिका आश्वासन दिलं की तो त्या ॲप्सवर बंदी आणेल.