Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केला आनंद!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 13, 2021 | 6:50 PM

‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाने (Rannvijay Singha) पुन्हा पिता झाल्याचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रणविजयने एका खास पोस्टसह आपल्या चिमुकल्या मुलाचे स्वागत केले आहे.

Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केला आनंद!
रणविजय सिंघा आणि कुटुंब
Follow us

मुंबई : ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघाने (Rannvijay Singha) पुन्हा पिता झाल्याचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. रणविजयने एका खास पोस्टसह आपल्या चिमुकल्या मुलाचे स्वागत केले आहे. रणविजय आणि प्रियांकाच्या लग्नाला आता 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. या जोडप्याला कायनात नावाची चार वर्षांची मुलगी आहे. सोमवारी रात्री रणविजयने आपल्या चिमुकल्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर केली आहे.

रणविजयने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात स्नीकर आणि लाल जर्सीची एक छोटी जोडी दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रणविजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सतनाम वाहेगुरू..’ रणविजयच्या या पोस्टनंतरच त्याच्या मित्रपरिवाराने आणि चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

शुभेच्छांचा पाऊस

रणविजयचा मित्र निखिल चिनप्पा याने कमेंट करताना लिहिले की, ‘खूप खूप अभिनंदन, काईचा धाकटा भाऊ आणि आपल्या कुटुंबातील नवीन सदस्याचे खूप खूप अभिनंदन. रोडीजमधील रणविजयची सहपरीक्षक नेहा धुपियासुद्धा लिहिते की, ‘ या आनंदाच्या बातमीसाठी रण, प्रि आणि काई यांचे खूप अभिनंदन.’ याशिवाय गौहर खान, वरुण सूद, प्रिन्स नरुला, युविका चौधरी अशा अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

या कोरोना काळात पालकत्व स्वीकारणे रणकविजयसाठी खूप आव्हानात्मक होते. या वर्षाच्या सुरूवातीस, साथीच्या आजाराच्या काळात पालकत्व स्विकारण्याच्या भीतीविषयी बोलताना रणविजय म्हणाला की, “साथीच्या काळात मुलाला जन्म देणे खूप काळजीचे आहे. परंतु, आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे.”

बाबा झाल्यावर जबाबदार झालो!

अभिनेता रणविजय सिंघा सध्या व्हीजे म्हणून काम करतो आहेत. याशिवाय तो एम.टी.व्ही.चा एक मोठा नावाजलेला चेहरा आहे. रणविजय आणि प्रियांकाची भेट पहिल्यांदा एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली आणि यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी राजी केले. एका बाळाचे पिता झाल्यावर आपणही जबाबदार झालो आहोत, असे रणविजय सिंघा नेहमी सांगतो. रणविजयच्या पहिल्या मुलीचा जन्म लंडनमध्ये झाला होता.

(Rannvijay Singha And Prianka Welcome Baby Boy)

हेही वाचा :

First Look | रश्मिकासोबतच्या ‘गुडबाय’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक सोशल मीडियावर चर्चेत!

‘उफ्फ ये खूबसूरती’, गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये ‘नागिन’ फेम सुरभी चंदनाचे ग्लॅमरस फोटोशूट!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI