AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

First Look | रश्मिकासोबतच्या ‘गुडबाय’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक सोशल मीडियावर चर्चेत!

‘गुडबाय’ हा रश्मिकाचा दुसरा बॉलिवूड चित्रपट असणार आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता चाहत्यांची प्रतीक्षा जरा कमी होणार आहे. कारण अमिताभ बच्चनचा लूक रश्मिकाच्या फॅन पेजने शेअर केला आहे.

First Look | रश्मिकासोबतच्या ‘गुडबाय’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक सोशल मीडियावर चर्चेत!
गुडबाय
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 3:58 PM
Share

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) दाक्षिणात्य मनोरंजन विश्व गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिकासह अमिताभ बच्चन (Amitabh Bahchan) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘गुडबाय’ हा रश्मिकाचा दुसरा बॉलिवूड चित्रपट असणार आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता चाहत्यांची प्रतीक्षा जरा कमी होणार आहे. कारण अमिताभ बच्चनचा लूक रश्मिकाच्या फॅन पेजने शेअर केला आहे.

पाहा अमिताभ बच्चन यांचा लूक

गुडबायच्या सेटवरून व्हायरल झालेल्या या फोटोत अमिताभ बच्चन आणि रश्मिका एका फोनमध्ये पाहत आहेत. फोटोमध्ये बिग बींनी कुर्ता पायजामा नेहरू जॅकेट परिधान केले आहे. त्याच वेळी, सॉल्ट अँड पेपर हेअर स्टाईल केलेली दिसते. दुसरीकडे रश्मिका कॅज्युअल लूकमध्ये दिसते आहे.

एकता कपूर ‘गुडबाय’ची निर्मिती करत आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. एकता कपूरने अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. तिने म्हटले होते की, ‘गुडबाय’ हा माझ्यासाठी खूप विशेष विषय आहे. यात भावनांसह मनोरंजन देखील आहे. ही प्रत्येक कुटुंबाची कहाणी आहे. अमिताभ बच्चन सोबत काम करणे रोमांचक आहे आणि सुंदर रश्मिका मंदना देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

राश्मिकाने शेअर केले फोटो

रश्मिका मंदनाने आपला वाढदिवस गुडबायच्या सेटवर साजरा केला. तिने सेटवरून अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला. फोटोंमध्ये बिग बी मास्क परिधान करून रश्मिका सोबत उभे दिसत होते. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

‘गुडबाय’मध्ये प्रथमच नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात रश्मिका, नीना गुप्ता आणि बिग बी व्यतिरिक्त पावेल गुलाटी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तो अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या प्रोजेक्ट्सची रंग लागली आहे. ते रणबीर-आलियासोबत ‘ब्रह्मास्त्र’, अजय देवगणसोबत ‘मे डे’,  इमरान हाश्मीसोबत ‘चेहरे’ आणि ‘झुंड’ दिसणार आहेत.

(Amitabh Bachchan’s First look from Goodbye movie goes viral on social media)

हेही वाचा :

रणबीर-श्रद्धाचं ‘पुनश्चः हरिओम’, आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला रवाना!

‘उफ्फ ये खूबसूरती’, गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये ‘नागिन’ फेम सुरभी चंदनाचे ग्लॅमरस फोटोशूट!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.