मुली सज्जन नसतात, त्यांना कोणतीच मर्यादा…, महिलांबद्दल प्रसिद्ध सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य

मुली सज्जन नसतात, त्यांना कोणतीच मर्यादा..., महिलांबद्दल प्रसिद्ध सेलिब्रिटीतं वादग्रस्त वक्तव्य, एवढंच नाही तर, पुरुषांना येणाऱ्या हार्ट अटॅकच कारण देखील महिलाच..., सगळीकडे चर्चांना उधाण

मुली सज्जन नसतात, त्यांना कोणतीच मर्यादा..., महिलांबद्दल प्रसिद्ध सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Nov 04, 2025 | 12:19 PM

रिऍलिटी शो ‘रोडीज’चा माजी परीक्षक रघू राम कायम त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता देखील त्याने महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रघू राम याने आता महिलांना असं काही म्हटलं आहे, जे अनेकांना खटकलं आहे. पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचं कारण फक्त आणि फक्त महिला असतात… असा दावा रघू राम याने केला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी पुरुषाांचा हार्ट अटॅकने मृत्यू होका… यासाठी रघू याने महिलांना जबाबदार ठरवलं आहे आणि मुली काही सज्जन नसतात… असं देखील रघू म्हणाला आहे… अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे.

नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रघू राम म्हणाला, ‘जे पुरुष कमावत नाही महिला अशा पुरुषांचा आदर करत नाहीत… पुरुषांनी जर म्हटलं, ज्या मुली दिसायला सुंदर नाही, त्या मुली आमच्या प्रेमास पात्र नाही… असं आम्ही म्हणायला सुरुवात केली तर? सौंदर्य एका वयापर्यंत असतं, पण आमची वर्ष वाढतील तशी आमची कमाई वाढते… आम्ही कधी कोणती अट घातली आहे का?’

पुढे रघू राम म्हणाला, ‘महिलांना भावनिक पुरुष आणि संवेदनशील आवडत नाही… जर एखाद्या पुरुषाने मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुली म्हणतात ‘काय मुलींसारखा रडत आहेस…’ त्यामुळे स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करण्यापेक्षा पुरुषांनी हृदयविकाराचा झटका किंवा बायपास सर्जरी करणं जास्त सोपं वाटतं…’.

मुलींच्या स्वभावाबद्दल देखील रघू याने मोठा खुलासा केला आहे. ‘मुली सज्जन नसतात. स्वभावाने आक्रमक असलेल्या अनेक मुलींना मी पाहिलं आहे… ज्या पुरुषांपेक्षा जास्त आक्रमक होत्या… अनेक मुलींच्या आवाजात परिस्थितीनुसार बदल बोतात… त्यांच्या टोन आणि रागात लगेच बदल होतो… पुरुषांना एक मर्यादा असते. पण महिलांमध्ये ती मर्यादा नसते… त्या इतक्या रागात व्यक्त होतात की, पुरुष खरंच घाबरतात…’ सध्या सर्वत्र रघू राम याच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

रघू राम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक रिऍलिटी शो होस्ट आणि अभिनेता आहे. जो एमटीवी रोडीज आणि एमटीवी स्प्लिट्सविला या शोंसाठी रघू प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्याचा जुळा भाऊ राजीव लक्ष्मण आहे आणि त्यांनी मिळून एक निर्मिती कंपनी सुरू केली आहे. पण आता रघू राम महिलांबद्दलच्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे चर्चेत आला आहे.