बायकोला सोडून परदेशी महिलेशी केले लग्न, सुपरस्टार अभिनेत्याची झाली होती जगभरात चर्चा

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अभिनेत्याने 70च्या दशकात बायकोला घटस्फोट देऊन एका परदेशी महिलेशी लग्न केले होते. तेव्हा या अभिनेत्याची जगभरात चर्चा झाली होती.

बायकोला सोडून परदेशी महिलेशी केले लग्न, सुपरस्टार अभिनेत्याची झाली होती जगभरात चर्चा
Saeed Jaffrey
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 15, 2026 | 1:56 PM

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. ते कोणाला डेट करत आहेत, त्यांनी कोणाशी लग्न केले, ते कोणासोबत राहात आहेत अशा अनेक गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. बॉलिवूडमधील एक अभिनेता असे होते ज्यांची जगभरात चर्चा रंगली होती. कारण त्यांनी 70च्या दशकात पत्नीला सोडून परदेशी महिलेशी लग्न केले होते. आता हा अभिनेता कोण होता? चला जाणून घेऊया…

आम्ही हिंदी सिनेमातील अत्यंत उत्कृष्ट कलाकार सईद जाफरी यांच्याविषयी बोलत आहोत. अनेक चित्रपटांत आपल्या दमदार अदाकारीची जादू दाखवणारे सईद जाफरी यांनी हॉलिवूडच्या जगतातही आपली ओळख निर्माण केली होती. आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त आणि अभिनयाव्यतिरिक्त ते आपल्या वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत राहिले. त्यांनी बायको सोडून परदेशी महिलेशी लग्न केले होते.

Loading...

कधी ऑल इंडिया रेडिओत काम करायचे

सईद जाफरी यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी पंजाबच्या मलेरकोटला येथे झाला होता. अभिनेते होण्यापूर्वी त्यांनी ऑल इंडिया रेडिओत काम केले होते. ते इंग्रजी अनाउन्सर म्हणून काम करत होते. त्यानंतर अभिनयात येण्यासाठी त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘युनिटी थिएटर’ नावाच्या इंग्रजी थिएटरची स्थापना केली होती.

या बॉलिवूड चित्रपटांमधून निर्माण केली ओळख

सईद जाफरी यांनी हिंदी सिनेमात आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९७७ साली ‘शतरंज के खिलाड़ी’ या चित्रपटाने केली होती. हिंदी सिनेमात त्यांना ओळख ‘चश्मे बद्दूर’, ‘मासूम’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दिल’, ‘हीना’, ‘राम लखन’ आणि ‘आईना’ सारख्या चित्रपटांमधून मिळाली होती.

हॉलिवूडमध्येही केले काम

सईद यांनी हॉलिवूडमध्ये काम बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वीच सुरू केले होते. त्यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘द गुरु’ (१९६९) होता. त्याचे दिग्दर्शन जेम्स आयव्हरी यांनी केले होते. सईद जाफरी ‘द विल्बी कॉन्स्पिरसी’, ‘द मॅन हू वुड बी किंग’, ‘डेथ ऑन द नाईल’, ‘गांधी’, ‘द रेजर्स एज’, ‘अ पॅसेज टू इंडिया’ आणि ‘द डिसीव्हर्स’ यासह अनेक हॉलिवूड चित्रपटांचा भाग होते.

बायकोला सोडून केले होते परदेशी महिलेशी लग्न

अभिनयाच्या जगात काम करताना सईद यांची भेट अभिनेत्री आणि लेखक मधुर (खरे नाव मेहरून्निसा) यांच्याशी झाली होती. नंतर दोघांनी १९५८ साली लग्न केले होते. दोघांना तीन मुली – सकीना, जिया आणि मीरा. मात्र दोघांचे नाते जास्त काळ टिकले नाही. त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यांनी १९६६ मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेत्याने दुसरे लग्न घटस्फोटानंतर ११ वर्षांनी परदेशी महिला जेनिफर सोरेल यांच्याशी केले होते. सईद यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us