Sai Pallavi Movie Box Office Collection : साई पल्लवीच्या ‘O.M ऑपरेशन मोल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री; पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा पार

साऊथ इंडियन मूव्ही म्हटलं की काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार याची प्रत्येक प्रेक्षकांना खात्री असते. बॉलिवूडपेक्षा साऊथच्या मूव्हीचे प्रेक्षक दिवाने असतात. अशातच साई पल्लवी, धनुष आणि मम्मूट्टीचा नवा चित्रपट रिलीज झालाय आणि या सिनेमाने पहिल्याच दिवशी कोट्यावधींचा टप्पा पार केला आहे.

Sai Pallavi Movie Box Office Collection :  साई पल्लवीच्या O.M ऑपरेशन मोल  चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री; पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा पार
sai pallavi
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 21, 2026 | 4:07 PM

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील 3 मोठी नावे एकाच चित्रपटात आली आणि प्रेक्षकांचे नजर जाणार नाही असं होणारचं नाही. अभिनेता धनुष, मल्याळम सुपरस्टार मम्मूट्टी, आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला O.M ऑपरेशन मोल हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. भारतात 17. 70 कोटी रुपयांची कमाई केली तर
जगभरात पहिल्याच दिवशी 31.55 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे

साई पल्लवीने चित्रपटासाठी केलेला खास लुक चर्चेत

या चित्रपटात साई पल्लवी नित्या रेड्डी नावाच्या IPS अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. लाल चंदनच्या तस्करीचा मोठा कट उध्वस्त करण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली विशेष पदक मोहीम राबवली जाते. या मोहिमेत धनुषने साकारलेला ‘पळणी’ हा गुप्तहेर तस्करांच्या टोळीत प्रवेश करतो. तर मम्मूट्टी या तस्करीच्या साम्राज्याचा प्रमुख बर्मा कार्तिकेन यांच्या भूमिकेत दिसत आहे. तामिळनाडू पासून दुबईपर्यंत पसरलेल्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यावर या चित्रपटाची कथा फिरते

Loading...

पहिलाच दिवशी किती कमाई ?

पहिला दिवसाच्या कमाईच्या आकडे पाहिले तर चित्रपटाने भाग जात 17. 70 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई 20. 55 कोटी रुपये आहे. त्यात तमिळ आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून तिने 13.35 कोटी रुपये कमावलेत तेलुगु आवृत्तीने 4 कोटी तर हिंदी आवृत्तीने 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. परदेशातील बाजारपेठेतून चित्रपटाने 11 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची जगभरात कमाई 31. 55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे

धनुषच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे ओपनिंग

या कमाईमुळे ‘O.M. ऑपरेशन मोल’ने धनुष्य याआधीच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेमागे टाकलेत. ‘रायन’ याने पहिल्या दिवशी 13. 65 कोटी, तर ‘कुबेरा’ने 14.75 कोटी रुपये कमावले होते. तर ‘तेरे इश्क मे’ च्या 16 कोटी रुपयांच्या ओपनिंगलाही OM ने मागे टाकला आहे. त्यामुळे धनुषच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग या चित्रपटाला मिळाला आहे.

राजकुमार पेरिया स्वामी यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले धनुष, मम्मूट्टी आणि साई पल्लवी यांच्यासोबत श्रीलीला नसिरुद्दीन शाह, इंद्रन्स यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत आता पहिल्याच दिवसाच्या दमदार सुरुवातीनंतर वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us