‘देवमाणूस’मध्ये चक्क सई ताम्हणकर? फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

'देवमाणूस – मधला अध्याय' ही मालिका येत्या 2 जूनपासून दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून किरण गायकवाड पुन्हा एकदा खलनायकी भूमिकेत पुनरागमन करतोय.

Updated on: May 30, 2025 | 1:01 PM
1 / 7
साताऱ्यात ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेच्या लाँच कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास हजेरी लावली होती.

2 / 7
संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं. कारण खास सई ताम्हणकर हिंमतराव टेलरिंग शॉपचं उद्घाटन करायला आली होती.

3 / 7
या कार्यक्रमाला संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. गोपाळच्या संपूर्ण कुटुंबाने सईचं मनापासून स्वागत केलं. गोपाळने स्वतः सईला कार्यक्रमस्थळी घेऊन येत आदराने तिचं स्वागत केलं.

4 / 7
हिम्मतरावांनी सईचं कौतुक करत सांगितल की, “महिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे, म्हणूनच मी माझा मुलगा गोपाळला स्वतःचं टेलरिंग शॉप सुरू करायला मदत केली.”

5 / 7
यावेळी सरू आज्जीनेही आपल्या खास शैलीत संवाद साधत मजा आणली. तिचं बोलणं सगळ्यांनाच खूप भावलं. या सगळ्यांच्या प्रेमाने साई भारावून गेली.

6 / 7
तिने गोपाळला सांगितलं, “तुझं काम खूप छान आहे. तू मुंबईत टेलरिंग शॉप सुरू कर. मी तुझी पहिली ग्राहक असेन. तुझं नाव फिल्म इंडस्ट्री आणि फॅशन शोमध्येही फेमस होईल.” तिने सरू आज्जीचंही मनापासून कौतुक केलं आणि ती सरू आज्जीची फॅन असल्याचंही सांगितलं.

7 / 7
या कार्यक्रमात 'देवमाणूस – मधला अध्याय' या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांच्यासोबत निर्माते संजय खांबे आणि श्वेता शिंदे हे देखील उपस्थित होते. 'श्वेता शिंदेनं परिधान केलेल्या ब्लाऊजवर मागे 'देवमाणूस' हे नाव खास शिवलेलं होतं.