एकाच फ्रेममध्ये दिसले सलमान खान – ऐश्वर्या राय; बऱ्याच वर्षांनंतर आले इतके जवळ

सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र या दोघांच्या नात्यात आलेली कटुता ही इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. म्हणूनच या जोडीला एकाच फ्रेममध्ये पाहणं हे चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही.

एकाच फ्रेममध्ये दिसले सलमान खान - ऐश्वर्या राय; बऱ्याच वर्षांनंतर आले इतके जवळ
सलमान खान आणि ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2023 | 8:12 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांना एकत्र किंवा एकाच फोटो फ्रेममध्ये पाहणं हे चाहत्यांसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे बरेच कलाकार त्या व्यक्तीसमोर जाणं सहसा टाळतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन. या दोघांना एकत्र पाहणं चाहत्यांसाठी कधीच शक्य नसलं तरी नुकतेच हे दोघं एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या दोघांना वेगवेगळं अनेकदा पाहिलं गेलंय. आता इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्या आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत, त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, गौरी खान, ऐश्वर्या राय यांसह बरेच सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये सलमान आणि शाहरुख हे दोघं ‘स्पायडर मॅन’ फेम अभिनेता टॉम होलँड, झेंडाया आणि नीता अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र या फोटोमागील व्यक्तीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पहा फोटो

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत दिसून येत आहे. त्यामुळे योगायोगाने का होईना, सलमान आणि ऐश्वर्याला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कारण या दोघांना एकत्र पाहणं हे चाहत्यांसाठी कोणा सरप्राइजपेक्षा कमी नाही. हा फोटो पाहिल्यानंतर काही युजर्सनी फोटोग्राफरला ‘स्मार्ट’ म्हटलंय. तर दुसरीकडे आराध्यासोबत रेखा यांच्या फोटोवरूनही कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र या दोघांच्या नात्यात आलेली कटुता ही इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. म्हणूनच या जोडीला एकाच फ्रेममध्ये पाहणं हे चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही. ऐश्वर्या सध्या तिच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.