पूजा हेगडेच्या कुटुंबातील ‘या’ खास व्यक्तीच्या लग्नात पोहोचला सलमान खान; फोटो-व्हिडीओ व्हायरल

सलमानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पूजा मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सलमानने पूजाच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीच्या लग्नाला हजेरी लावली.

पूजा हेगडेच्या कुटुंबातील या खास व्यक्तीच्या लग्नात पोहोचला सलमान खान; फोटो-व्हिडीओ व्हायरल
पूजा हेगडेच्या कुटुंबातील 'या' खास व्यक्तीच्या लग्नात पोहोचला सलमान खान
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 02, 2023 | 6:42 PM

मुंबई: अभिनेता सलमान खान हा पूजा हेगडेला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांवर अद्याप दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सलमानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पूजा मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सलमानने पूजाच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीच्या लग्नाला हजेरी लावली. ही व्यक्ती म्हणजे पूजाचा भाऊ आहे. पूजा हेगडेच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाच्या कुटुंबीयांसोबत सलमानची जवळीक पाहून नेटकऱ्यांनाही या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचा प्रश्न पडला आहे.

सलमानने पूजाच्या कुटुंबीयांसोबत एका फॅमिली फोटोमध्येही पोझ दिली आहे. पूजाचा भाऊ ऋषभ हेगडेचं 30 जानेवारी रोजी लग्न पार पडलं. या लग्नाला सलमानने ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये हजेरी लावली होती. ऋषभ आणि त्याची पत्नी शिवानी यांच्यासोबत उभं राहून सलमानने फोटोसुद्धा काढले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये पूजा संगीत कार्यक्रमात सलमानच्या ‘छोटे छोटे भाईयों के बडे भैय्या’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. सलमानसुद्धा या संगीत कार्यक्रमात सहभागी झाला होता.

सलमान खान आणि पूजा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स कंपनीकडून केली जातेय. यामध्ये सलमान आणि पूजासोबत व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत.

पूजा हेगडेनं ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर पूजा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पूजाने चांगलं नाव कमावलं आहे. तिने आतापर्यंत मोठमोठ्या दाक्षिणात्य कलाकारांसोबत काम केलं आहे.