Salman Khan: सलमान खान ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? वयाने 24 वर्षांनी आहे लहान

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Dec 09, 2022 | 10:52 AM

सलमानच्या आयुष्यात नवं प्रेम? लोकप्रिय अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये, सोबत चित्रपटातही करणार काम

Salman Khan: सलमान खान 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? वयाने 24 वर्षांनी आहे लहान
Salman Khan
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. मॉडेल लुलिया वंतूरचं नाव अनेकदा सलमानसोबत जोडलं गेलं. सलमानच्या पार्ट्यांना आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही तिची हजेरी पाहिली गेली. मात्र सलमान लुलियाच्या नाही तर एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचं कळतंय. ही अभिनेत्री फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. प्रभास, अल्लू अर्जुन, रामचरण, नाग चैतन्य, महेश बाबू यांसारख्या साऊथ सुपरस्टार्ससोबत तिने काम केलंय.

सलमानचं याआधी अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं. यातील काही नाती अत्यंत वाईट वळणावर येऊन तुटली. गेल्या काही वर्षांपासून तो अनेकदा लुलियासोबत दिसला. मात्र एक चित्रपट समिक्षकाने ट्विट करत सलमानच्या या नव्या प्रेमाविषयी मोठा खुलासा केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील गॉसिप देणाऱ्या उमैर संधूने याविषयी ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, ‘ब्रेकिंग न्यूज- बीटाऊनमध्ये नवीन जोडी आली आहे. मेगास्टार सलमान खानला पूजा हेगडेवर प्रेम जडलंय. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने पूजासोबत दोन चित्रपटसुद्धा साइन केले आहेत. सध्या हे दोघं एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. या गोष्टीला सलमानच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने दुजोरा दिला आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

सलमान खान आणि पूजा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स कंपनीकडून केली जातेय. यामध्ये सलमान आणि पूजासोबत व्यंकटेश आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI