सलमान खान याच्या मेहुण्याच्या कारला अपघात, नशेत असताना…

Salman Khan : सलमान खान याच्या कुटुंबात चिंतेचं वातावरण, जवळच्या व्यक्तीचा अपघात, नशेत असताना..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अपघाताची चर्चा...

सलमान खान याच्या मेहुण्याच्या कारला अपघात, नशेत असताना...
| Updated on: Dec 17, 2023 | 3:10 PM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याच्या गाडीचा नुकताच मुंबईत अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी आयुष शर्मा त्याच्या कारमध्ये उपस्थित नव्हता आणि त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तेव्हा नशेत असलेल्या एका कार चालकाने आयुष याच्या कारला धडक दिली. ही घटना खार येथील जीम खान येथे घडली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा ड्रायव्हर देखील सुखरुप आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

आयुष शर्मा याच्या कारचा अपघात झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पण सुदैवाने आयुष शर्मा आणि त्याच्या ड्राव्हरला काहीही झालेलं नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि आयुष शर्मा याच्या कारच्या अपघाताची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, आयुश शर्मा, सलमान खान याची बहीण अर्पिता शर्मा हिची पती आहे.

 

आयुष शर्मा याने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आयुष याने ‘अंतिम’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्याचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आहे. अद्यापही आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःती ओळख निर्माण करु शकला नाही.

अभिनेता सलमान खान याचा मेहुणा म्हणून देखील आयुष शर्मा कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. भाईजान याची बहीण अर्पिता शर्मा हिच्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष याने दोन मुलांचं जगात स्वागत केलं. आयुष आणि अर्पिता एक मुलगा आणि एका मुलीचे आई – वडील आहेत.

आयुष शर्मा अद्याप लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करु शकला नसला तरी, त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयुष कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. एवढंच नाही तर, आयुष शर्मा कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.