‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीत सलमान समोर येताच, पापाराझींनी लगेच..या कृतीची सगळीकडे चर्चा, VIDEO

अभिनेता सलमान खानने रुग्णालयाबाहेर पापाराझींचं वागणं पाहून तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता पापाराझींनी त्याची जाहीर माफी मागितली आहे. सलमानचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजा शिवाजी सिनेमाच्या सक्सेस पार्टीत सलमान समोर येताच, पापाराझींनी लगेच..या कृतीची सगळीकडे चर्चा, VIDEO
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2026 | 9:27 AM

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे आणि काही पोस्टमुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी रात्री जेव्हा सलमान त्याच्या एका जवळच्या व्यक्तीला भेट देण्यासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचला, तेव्हा पापाराझींनी त्याचा पाठलाग केला होता. रुग्णालयातून सलमान बाहेर येताच पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्यास सुरुवात केली. ‘भाई.. भाई’ म्हणून ते जोरजोरात रुग्णालयाबाहेर ओरडू लागले आणि फोटो क्लिक करू लागले. पापाराझींचं हे वागणं पाहून सलमानचा संताप अनावर झाला. ‘तुम्ही पागल झाले आहात का’, असं म्हणत त्याने त्यांच्यावर राग व्यक्त केला. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरील संताप स्पष्ट पहायला मिळत आहे. त्यानंतर काही तासांतच त्याने इन्स्टाग्रामवर चार ते पाच पोस्ट लिहिले. या पोस्टमध्ये त्याने पापाराझींना त्यांच्या वागण्याबद्दल फटकारलं. अखेर पापाराझींना त्यांची चूक समजली आणि त्यांनी सलमानची सर्वांसमोर माफी मागितली.

बुधवारी अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या यशानिमित्त एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक कलाकार पोहोचले होते आणि त्यात सलमानसुद्धा होता. रितेशच्या या चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सलमान खान त्याठिकाणी पोहोचताच पापाराझींनी ‘सॉरी भाई, सॉरी भाई’ बोलायला सुरुवात केली. तेव्हा भाईजाननेही मन मोठं करत त्या सर्वांसमोर फोटोसाठी पोझ दिले आणि त्यांची माफीसुद्धा स्वीकारली. थोड्या वेळानंतर सलमान रितेशसोबत बाहेर आला आणि तेव्हा दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. यावेळीसुद्धा पापाराझी त्याची माफी मागत होते.

सलमानने पापाराझींना माफ केलं आणि त्यांना मस्करीत म्हटलं की “जोरात सॉरी बोला.” त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत मजामस्तीसुद्धा केली. सलमानचा हा अंदाज पाहून रितेशलाही हसू अनावर झालं. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधील सलमानचे बरेच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमानने पापाराझींवर राग व्यक्त करत सोशल मीडियावर काही पोस्ट लिहिले होते. त्यात त्याने म्हटलं होतं, ‘जर मला हॉस्पिटलमध्ये कोणताही पत्रकार माझ्या वेदनांचा आनंद घेताना दिसला, ज्यांच्यासाठी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांच्याशी मी बोललो, ज्यांची मी काळजी घेतली आणि त्यांना उदरनिर्वाह करता येईल याची खात्री केली. पण जर तुम्हाला माझ्या नुकसानीतून पैसे कमवायचे असतील, तर गप्प बसा.. चेष्टा करू नका. भाई भाई मातृभूमी.. भाई पिक्चर.. भाई हे… भाई ते.. चित्रपट महत्त्वाचा आहे की आयुष्य? असे मी शंभर जाळून टाकेन. भाईच्या दु:खावर पुढच्या वेळी माझ्यासोबत प्रयत्न करून पहा. फक्त प्रयत्न करून पहा. जेव्हा कधी तुमची व्यक्ती रुग्णालयात असेल, तेव्हा मी असं वागेन का? साठ वर्षांचा झालो आहे, परंतु लढायला विसरलो नाही, हे लक्षात ठेवा. तुरुंगात टाकणार का.. हा हा हा.’ सलमानच्या या पोस्ट नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्याची बाजू घेतली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us