‘तू काय समजतेस स्वत:ला…’; सलमान खान झापत होता अन् फरहाना हसली, हे पाहून सलमानचा पारा चढला

शनिवारी 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानने सर्वच स्पर्धकांची शाळा घेतली. पण फरहाना भट्टने नीलम गिरी आणि बसीर अली खान यांनी रागात जे अपशब्द वापरले त्याबद्दल सलमान खानने तिला चांगलंच झापलेलं पाहायला मिळालं.

तू काय समजतेस स्वत:ला...; सलमान खान झापत होता अन् फरहाना हसली, हे पाहून सलमानचा पारा चढला
Salman Khan Furious Outburst at Bigg Boss 19 Contestant Farhana Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2025 | 11:55 PM

‘बिग बॉस 19’ मध्ये आता स्पर्धकांबद्दल टास्कच्या चर्चा कमी पण वादाचे मुद्दे मात्र जास्तच चर्चेत येताना दिसत आहे. शनिवारी विकेंड का वारमध्ये सलमान खानने घरातील सर्वच स्पर्धकांची शाळा घेतली पण त्यात सर्वात जास्त कोणाला फटकारलं असेल तर ते फरहाना भट्टला. कारण तिने घरात वादादरम्यान अनेक अपशब्द वापरले, शिव्याही दिल्या. ज्याबद्दल सलमान खानने तिला चांगलंच सुनावलं आहे.

सलमान खानने ‘वीकेंड का वार’ घेतली घरच्यांची शाळा 

फरहाना भट्टने नीलम गिरी आणि बसीर अली खान यांच्याबद्दल खूप अपमानास्पद शब्द वापरले. याबद्दल सलमान खानने ‘वीकेंड का वार’ मध्ये फरहानाला खूप झापल्याचं पाहायला मिळालं.

फरहानाशी बोलण्याआधी सलमान खान प्रणित मोरेला स्टोअर रूममध्ये जे ठेवले आहे, ते घेऊन यायला सांगतो. प्रणित स्टोअर रूममधून एक पुस्तक आणतो ज्यावर लिहिलेले असते ‘फरहाना अ‍ॅब्युज डिक्शनरी’. यानंतर सलमान फरहानाला सांगतो की “या पुस्तकात लिहिलेले शब्द मोठ्याना वाच म्हणजे तुझी आई देखील ते पाहत असेल, तिलाही ते वाचून दाखव.”

सलमान खान फरहानावर चांगलाच भडकला

यानंतर फरहाना भट्ट पुस्तकात लिहिलेले शब्द वाचते, पुस्तकात लिहिले शब्द म्हणजे तिने वादात वापरलेले अपशब्द असतात ‘कुत्रा, भिकारी आणि दोन पैशांची किंमत नाही, घाणेरडा, सहा फूट कचरा’ वैगरे असे शब्द तिने घरातील स्पर्धकांना वापरले होते. यानंतर सलमान खानने तिच्या प्रत्येक अपशब्दाचे अर्थ सांगत तिला चांगलंच झापलं. पण हे शब्द वाचताना फरहानाला हसूही येत होतं . त्यामुळे सलमान तिच्यावर जास्तच चिडलेला दिसला.

‘पीस एक्टिविस्टसारखं अजिबात वागत नाहीयेस’

त्यानंतर सलमान फरहानाला विचारतो ‘तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ही तुझी सामान्य भाषा आहे का? तुम्ही शांतता कार्यकर्त्या म्हणजे पीस एक्टिविस्ट आहात, कोणत्याही दृष्टिकोनातून ती पीस एक्टिविस्टसारखी दिसते का? पीस एक्टिविस्टचा अर्थ असा आहे की जर भांडणे झालं असेल तर तुम्ही जाऊन ती सोडवा. लोकांना एकमेकांचे मित्र बनवा. पण तू तर याच्या उलट वागताना दिसत आहे.’ असं म्हणत सलमान खान रागावला.


मीही त्याचपद्धतीने तुझ्यावर रागवलं तर चालेल का?’

तसेच सलमान खानने फरहानाला तिचा अहंकार कमी करण्यास सांगितला. तो थेट तिला म्हणाला की तिचा अहंकार फार मोठा आहे. म्हणून ती कोणाचंही ऐकत नाही. त्यानंतर फरहाना भट्ट पुढे स्पष्ट करते की तिने हे रागात म्हटले होते. यावर सलमान खान पुढे म्हणतो- ‘तू रागात काहीही बोलशील. मग मीही त्याचपद्धतीने तुझ्यावर रागवलं तर चालेल का?’ असं म्हणत सलमान चांगलाच भडकलेला दिसला.

एकंदरीत सलमान खानने शनिवारी 6 सप्टेंबर रोजी विकेंड का वारमध्ये सर्व घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. आता रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.