Salman Khan | सलमान खानलाही ‘बार्बी’ची क्रेझ? भाऊ अरबाजच्या बर्थडे पार्टीचा लूक पाहून नेटकरी चक्रावले!

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर 'बार्बी' या चित्रपटाची तुफान क्रेझ पहायला मिळत आहे. सलमानचा पार्टीतील लूक पाहून त्याच्यावरही बार्बीच्या क्रेझचा परिणाम झाल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. काहींनी तर सलमानला 'बार्बी भाई' असंही म्हटलंय.

Salman Khan | सलमान खानलाही बार्बीची क्रेझ? भाऊ अरबाजच्या बर्थडे पार्टीचा लूक पाहून नेटकरी चक्रावले!
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2023 | 11:20 AM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खानने शुक्रवारी त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अरबाजच्या बर्थडे पार्टीसाठी पोहोचलेल्या सलमान खानच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमानला सहसा साध्या कपड्यांमध्येच पाहिलं जातं. मात्र भावाच्या बर्थडे पार्टीला त्याचा हटके लूक पाहून नेटकरीसुद्धा चक्रावले. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर ‘बार्बी’ या चित्रपटाची तुफान क्रेझ पहायला मिळत आहे. सलमानचा पार्टीतील लूक पाहून त्याच्यावरही बार्बीच्या क्रेझचा परिणाम झाल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. काहींनी तर सलमानला ‘बार्बी भाई’ असंही म्हटलंय.

पापाराझी अकाऊंटवर सलमानचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सलमानने काळ्या टी-शर्टवर राखाडी रंगाचा शर्ट आणि खाली गुलाबी रंगाची पँट घातल्याचं पहायला मिळत आहे. सलमानने त्याच्या एका मित्रासोबत या पार्टीला हजेरी लावली होती. पिंक पँटमधील सलमानचा हा भन्नाट लूक पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘बार्बी भाई’ असं एकाने म्हटलंय. तर ‘भाईलाही बार्बीची क्रेझ आहे वाटतं’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘भाई आज बार्बी बनलाय’ अशीही मजेशीर कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

पहा व्हिडीओ

सलमानच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकल नाही. सध्या त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कतरिना कैफ ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे. या दोघांशिवाय चित्रपटात इमरान हाश्मीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर सलमानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान सध्या बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनच्या सूत्रसंचालनात व्यग्र आहे. हा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन करण जोहरने केलं होतं. मात्र त्याला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता दुसऱ्या सिझनसाठी सलमानची निवड करण्यात आली. हा सिझन पहिल्या एपिसोडपासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.