सलमान खानने चिमुकलीसाठी जेव्हा दान केली होती शरीरातील ही गोष्ट, ठरला होता पहिला भारतीय

Salmah Khan : अभिनेता सलमान खान याने आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. पण तुम्हाला माहित आहे की सलमान खानने एका मुलीचे प्राण वाचण्यासाठी शरीरातील ही गोष्ट दान केली होती. त्यामुळे असं करणारा तो भारतातील पहिला व्यक्ती ठरला होता.

सलमान खानने चिमुकलीसाठी जेव्हा दान केली होती शरीरातील ही गोष्ट, ठरला होता पहिला भारतीय
| Updated on: Jul 29, 2024 | 9:05 PM

बॉलीवूडमधील सर्वात मोठे कलाकारांपैकी एक असलेल्या सलमान खानने आतापर्यंत अनेक गोष्टींनी आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. सलमान खान अभिनया व्यतिरिक्त अनेक गोष्टी करतो. तो एक प्रभावी व्यक्ती आहे. त्यामुळेच आजही बॉलिवूडमध्ये तो प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. सुपरस्टार सलमान खान हा दयाळू आहे. तो अनेक सामान्य लोकांना मदत करतो. पण अनेकांना माहित नसेल की सलमान खान बोन मॅरो दान केले आहे. असं करणारा तो भारतातील पहिला व्यक्ती ठरला आहे. पूजा नावाच्या चिमुरडीला सलमानने बोन मॅरो दान केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, 2010 साली पूजा नावाच्या चिमुरडीला तातडीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज होती. पण जेव्हा ही गोष्ट सलमान खानला कळली तेव्हा त्याने लगेचच तिला मदत करण्याचं ठरवलं. अशा प्रकारे तो भारतातील पहिला अस्थिमज्जा दाता ठरला. एका अहवालानुसार, अस्थिमज्जा दान करण्याचा सलमान खानचा निर्णय त्याने मॅरो डोनर रजिस्ट्री इंडियाला आवश्यक असल्यास मदत करण्यासाठी दिलेल्या वचनानुसार आहे. त्याचा भाऊ अरबाज खानही या उदात्त कार्यात सहभागी झाला होता.

एका मुलाखतीत सुनील शेट्टीने सलमान खानचे कौतुक केले होते. तो म्हणाला होता की, त्याच्या उदार कृतीतून त्याचा दयाळू स्वभाव कळून येतो. सलमान खान एक उत्कृष्ठ माणूस आहे. सलमान खानने अनेक वर्षांपूर्वी आपला बोन मॅरो कोणाला तरी दान केला होता.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो एआर मुरुगादासच्या ॲक्शन-पॅक्ड चित्रपट सिकंदरमध्ये दिसणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित या सिनेमात रश्मिका मंदान्ना, प्रतिक बब्बर आणि सत्यराज हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2025 च्या ईदला रिलीज होणार आहे.

सलमान खान हा नेहमीच त्याच्या संस्थेच्या मदतीने गरजु व्यक्तींना मदत करत असतो. बिंग ह्युमन ही त्यांची संस्था आहे. सलमान खान ईदच्या दिवशी त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो. सलमान खानची फॅन फॉलोईंग देखील मोठी आहे. भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत.