AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर

'काला हिरण' या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाशी या चित्रपटाचा संबंध असल्याचा दावा करत त्याच्या कायदेशीर टीमने निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला निर्मात्यांनी उत्तर दिलं आहे.

लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; 'काला हिरण'वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 03, 2026 | 10:41 AM
Share

अभिनेता सलमान खानच्या कायदेविषयक टीमने ‘काला हिरण : द बॅटल ऑफ लेगसी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणावर हा चित्रपट आधारित असल्याचा दावा असल्याने त्याला सलमानने विरोध केल्याचं कळतंय. राजस्थान उच्च न्यायालयात काळवीट शिकार प्रकरण प्रलंबित असल्याने चित्रपटामुळे न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचाही या नोटिशीत उल्लेख आहे. सलमानच्या या नोटिशीनंतर चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. 24 एप्रिल 2026 रोजी ही नोटीस पाठवण्यात आली असून चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनला तात्काळ थांबवण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भरत श्रीनाते यांनी केलं असून अमित जानी त्याचे निर्माते आहेत.

नोटिशीत काय म्हटलंय?

सलमानने पाठवलेल्या या नोटीसमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, हा चित्रपट काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या न्यायालयीन कार्यवाहीत हस्तक्षेप करू शकतो. त्यामुळे सलमानच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचंही उल्लंघन होऊ शकतं. तसंच या चित्रपटामुळे त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते, असाही दावा यात करण्यात आला आहे. काळवीट शिकार प्रकरण अद्याप राजस्थान उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने हा चित्रपट कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतो, असा युक्तीवाद या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाचं सनसनाटी चित्रण त्यात केलं असल्यास सलमानविरुद्ध पूर्वग्रह निर्माण होऊ शकतो आणि त्याच्या निष्पक्ष सुनावणीच्या हक्काशी तडजोड होऊ शकते, असंही त्यात म्हटलंय.

सलमानच्या कायदेशीर टीमने असाही आरोप केला आहे की अक्षय पांडे कलाकारांशी संपर्क साधून काळवीट शिकार प्रकरणाचा संदर्भ देत चित्रपटाचा सारांश आणि व्यक्तिरेखांची माहिती यांसारख्या गोष्टी प्रसारित करत होता. त्यानंतर त्यांना या चित्रपटाविषयी माहिती मिळाली. या नोटीसमध्ये पुढे असंही म्हटलंय की चित्रपटात सलमानचं नाव, व्यक्तिमत्त्व किंवा त्याच्याशी कथितरित्या संबंधित असलेल्या घटनांच्या कोणत्याही वापरास अधिकृत परवानगी किंवा संमती दिलेली नाही. चित्रपट निर्मात्यांवर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी सलमान आणि चित्रपट यांच्यात एक काल्पनिक संबंध निर्माण करून सलमानच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सलमानचा इशारा अन् निर्मात्यांचं उत्तर

‘काला हिरण’ या चित्रपटाच्या प्रमोशन आणि निर्मितीवर तात्काळ स्थगिती आणावी, अशी मागणी सलमानकडून करण्यात आली आहे. त्याचसोबत त्याने निर्मात्यांकडून बिनशर्त लेखी माफीचीही मागणी केली आहे. 24 तासांच्या आत याचं पालन न केल्यास नुकसान भरपाईसह दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर कारवाई होऊ शकते, असाही इशारा निर्मात्यांना देण्यात आला आहे.

सलमानच्या टीमकडून ही नोटीस मिळाल्यानंतर ‘काला हिरण’चे निर्माते अमित जानी यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘यामागचा हेतू लोकांच्या मनात भीती निर्माण करणं हा आहे, जेणेकरून लोक त्याच्या प्रभावाखाली येतील. लोकांना धमकावणं ही त्याची प्रवृत्ती आहे. मात्र मी या धमक्यांना सहजासहजी बळी पडणार नाही’, असं ते म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता