Salman Khan: सलमान खानकडून उलट्या दिशेने गणपतीची आरती; बहिणीने लगेच केला इशारा, व्हिडीओ व्हायरल
Salman Khan: गणपती बाप्पाला निरोप देताना खान कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दोन्ही पाहायला मिळाले. सलमानचा हा साधा आणि भक्तिभावपूर्ण अंदाज त्याच्या चाहत्यांनाही भावला आहे.

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या अभिनयासोबतच कुटुंबासोबतचे सण-उत्सव साजरे करण्यासाठीही ओळखला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खान कुटुंबीयांनी यंदाही बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला. गणपती विसर्जनाच्या वेळी सलमान खानने स्वतः आरती करत बाप्पाचं दर्शन घेतलं. या सोहळ्यात युलिया वंतूरही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. सलमानचा आरती करतानाचा व्हिडीओ मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान उलट्या दिशेने आरती करताना दिसत आहे. बहीण अर्पिता खानला ही गोष्ट लक्षात येताच तिने सलमानला खुणावलं, त्यानंतर त्याने योग्य दिशेने आरती केली.
खान कुटुंबीयांच्या गणपती विसर्जन सोहळ्यात सलमान खान अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाला. बाप्पाच्या मूर्तीसमोर आरती करताना त्याचा साधा आणि प्रसन्न अंदाज पाहायला मिळाला. गणेशोत्सव हा खान कुटुंबासाठी केवळ एक सण नसून कुटुंबातील सर्वांना एकत्र आणणारा खास प्रसंग असल्याचं त्यांच्या अनेक वर्षांच्या सेलिब्रेशनमधून दिसून येतं. यंदाच्या विसर्जन सोहळ्यातही कुटुंबीयांनी एकत्र येत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. सलमान खानसोबत युलिया वंतूरही या भक्तिमय क्षणात सहभागी झाली. दोघांनी मिळून बाप्पाची पूजा आणि आरती केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या फोटोंची विशेष चर्चा होत आहे.
पहा व्हिडीओ-
सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. आरतीपासून ते विसर्जनापर्यंत कुटुंबातील सदस्य उत्साहाने सहभागी होताना दिसतात. यापूर्वीही सलमान गणपती विसर्जनाच्या वेळी आरती करताना आणि कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करताना दिसला आहे.
बॉलिवूडमधील मोठे स्टार्स सणांच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांचं लक्ष आपोआप त्यांच्याकडे जातं. मात्र, खान कुटुंबाच्या गणपती उत्सवात सलमानचा सहभाग हा दरवर्षी चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो. यंदाही आरती, पूजा आणि विसर्जनाच्या निमित्ताने कुटुंबीय एकत्र आले. या सोहळ्यातील सलमान आणि युलियाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही त्याची चर्चा सुरू झाली आहे.